Home सामाजिक दोन दिवसात सवलत योजनेमधून रू. 2.75 कोटी वसुल

दोन दिवसात सवलत योजनेमधून रू. 2.75 कोटी वसुल

11 second read
0
0
53

no images were found

दोन दिवसात सवलत योजनेमधून रू. 2.75 कोटी वसुल

घरफाळा थकीत रक्कमेवरील 40 टक्के दंडव्याज सवलत योजनेचे शेवटचे दोन दिवस

कोल्हापूर: घरफाळा विभाकडून 40 टक्के दंडव्याज सवलत योजनेमधून 1204 करदात्याकडून रु. 2.75 कोटी रक्कम वसूल करण्यात आली आहे. शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीच्या दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास दंड व्याज मध्ये दि.1 ते 29 मार्च 2023 अखेर सवलत योजनेमधून 12,990 इतक्या करदात्यांनी रु.21,89,27,322/- इतकी थकीत रक्कम महानगरपालिकेकडे जमा केली आहे. दि.1 एप्रिल 2022 ते 29 मार्च 2023 अखेर 1,01,093 करदात्याकडून रु.73,78,38,692/- इतकी रक्कम जमा झाली आहे.

            या सवलत योजनेचे शेवटचे दोन दिवस राहिले राहिले असून नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे गुरुवार, दि.30 मार्च रोजी रात्री 10 वाजेपर्यत व 31 मार्च दिवसी रात्री 11 वाजेपर्यत सुरु ठेवण्यात येणार आहेत. यानंतर महानगरपालिका घरफाळा विभागाकडून 1 एप्रिल 2023 पासुन जे थकबाकीदार आहेत. त्यांचेवर जप्ती, मिळकतीवर बोजा चढवणे, मिळकत सिल करणे अशी कारवाई करण्यात येणार आहे. तरी असे कटु प्रसंग टाळण्यासाठी उर्वरित थकबाकी मिळकतधारकांनी आपला घरफाळा 31 मार्चपुर्वी भरुन या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

 

Load More Related Articles

Check Also

आजच्या बाजारपेठेत रिटेल गुंतवणूकदारांसाठी फ्लेक्सी कॅप फंड हा एक स्मार्ट पर्याय असू शकतो.  

आजच्या बाजारपेठेत रिटेल गुंतवणूकदारांसाठी फ्लेक्सी कॅप फंड हा एक स्मार्ट पर्याय असू शकतो. …