Home शैक्षणिक डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात लवकरच ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात लवकरच ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम

4 second read
0
0
56

no images were found

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात
लवकरच ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम
कोल्हापूर:(प्रतिनिधी )
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात लवकरच ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार आहे. याबाबत पुणे येथील बेरी एव्हीओनिक्स आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला.

बेरी एव्हीओनिक्स ही कंपनी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरशी संलग्नित असून उच्च कार्यक्षमतेचे ड्रोन तयार करते. यामध्ये ड्रोन डिसाईन, उत्पादन व विक्री या संबंधित सेवा देते. ऑटो-पायलट तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी ड्रोन बनविण्याचे ज्ञान या कंपनीमार्फत दिले जाते. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानातील नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार असून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते एकतर उद्योजक बनू शकतात किंवा ड्रोन इंडस्ट्री मध्ये सहज नोकरी मिळवू शकतात. या करारामध्ये विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय कार्यक्रम,जोड प्रकल्प, प्रगत संशोधन अशा बहूआयामी बाबी राबविण्यात येणार आहेत.यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.प्रथापन, कुलसचिव डॉ. जे.ए.खोत, डॉ. संदीप वाटेगावकर, बेरी एव्हीओनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री.ओ. एस. इनामदार, श्री.अल्बाकी सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

         कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले “भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे शेती विकसित करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज आहे. या कंपनीचा पुणे नंतर पश्चिम महाराष्ट्रात हा कोर्स कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांना लवकरच तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात हा कोर्स पूर्ण करता येणार आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.कुलसचिव डॉ.जे.ए.खोत यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करीत विविध प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रस्ताव, सेमिनार, कौशल्ययुक्त कोर्सेस संयुक्तरित्या राबविण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आले.

Load More Related Articles

Check Also

स्टार एअरवेजकडून आता बेंगलोर आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू, कोल्हापूर  विमानतळाच्या हवाई सेवेचे विस्तारीकरण

स्टार एअरवेजकडून आता बेंगलोर आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू, कोल्हापूर  विमानतळाच्या…