
no images were found
जिल्ह्यात गोवंशीय जनावरांचा बाजार भरविणे व जनावरांची वाहतूक करण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून शिथीलता
कोल्हापूर : महाराष्ट्र शासन अधिसूचना दि.८ सप्टेंबर २०२२ अन्वये संपूर्ण राज्य हे
नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. व ज्याअर्थी शासनाने वेळोवेळी अधिसूचना संदर्भ क्र.७, ८ व ९ अन्वये
नियंत्रित क्षेत्रात काही बंधने शिथिल केली आहेत आणि ज्याअर्थी जिल्ह्यामध्ये गोवंशीय पशुधनास लम्पी
चर्मरोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. २९ नोव्हेंबर
२०२२ नुसार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर
नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरविणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात असे
नमुद केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांचे यापुर्वीचे दि.९ सप्टेंबर २०२२ चे
आदेशान्वये लागू केलेले निर्बंध शिथिल करुन, प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण
अधिनियम, २००९, महाराष्ट्र शासनाची अधिसूचना दि. २९ नोव्हेंबर २०२२ व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना
दि.१७ जून २०२२ अन्वये प्राप्त अधिकारान्वये जिल्हयातील गोवर्गीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव
झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हयात कोणताही प्राणी बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतुक
व ने-आण करण्यास खालील अटींच्या आधिन राहून परवानगी देत आहे…..
१) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार जिल्हयांतर्गत वाहतुक व ने-आण करावयाच्या गुरांचे
(गोवर्गीय प्रजातींचे सर्व प्राणी) किमान २८ दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले
असलेबाबत पशुवैद्यकिय अधिकारी यांचे विहित नमुन्यातील लसीकरण प्रमाणपत्र तसेच लम्पी चर्मरोगाची लक्षण
दिसून आली नसलेबाबत पशुधन विकास अधिकारी, गट-अ यांचेपेक्ष कमी दर्जा नसलेले अधिकारी यांचे आरोग्य
प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
२) प्राण्यांचे वाहतुक अधिनियम २००१ मधील वाहतुक नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील प्राणी वाहतुक
अधिनियम २००१ अन्वये- अ. नियम ४७ नुसार वाहतुक करणाऱ्या प्राण्याचे विहित नमुन्यातील स्वास्थ्य
प्रमाणपत्र पशुधन विकास अधिकारी गट अ यांनी दिलेले असावे
आ. नियम ९६ नुसार वाहतुक करणाऱ्या प्राण्याचे विहित नमुन्यातील वाहतुक प्रमाणपत्र सहाय्यक आयुक्त
पशुसंवर्धन यांनी दिलेले असावे
३) वाहतुक करावयाचे गुरांची ओळख पठविण्यासाठी कानात १२ अंकी टॅग असणे व त्याची पोर्टलवर
नोंदणी बंधनकारक राहिल.
४) जिल्हयातील पशुबाजारामध्ये खरेदी व विक्री करतांना (कृषि उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत व इतर क्षेत्रे)
प्राण्याचे कानात टॅग व स्वास्थ्य प्रमाणपत्र बंधनकारक राहील तसेच बाजारामध्ये जंतुनाशक फवारणी ही बाजार
समितीस किंवा आयोजकास बंधनकारक राहील.
या आदेशाचे अंमलबजावणी सर्व संबंधित प्रशासकिय विभागांनी काटेकोरपणे करावी, असे निर्देश या
आदेशान्वये जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिले आहेत.