Home शासकीय शेतकऱ्यांनी शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

20 second read
0
0
83

no images were found

शेतकऱ्यांनी शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            मुंबई : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – वैयक्तिक शेततळे (मागेल त्याला शेततळे) घटकाकरिता सन 2023-24 मध्ये शासनाकडून 80 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून आतापर्यंत 7 हजार 316 शेततळ्यांकरिता शेतकऱ्यांना 50.81 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. तसेच 1 हजार 665 शेतकऱ्यांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

            या योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळेकरिता शासनाकडून आणखी 20 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच शेततळ्यास प्लॅस्टीक अस्तरीकरण करण्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत वेगळे अनुदान देण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी महा डीबीटी पोर्टलवरुन करण्यात येते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्या…