Home Uncategorized अज्ञात व्यक्तीने शाळेच्या गेटवर दिलेल्या चॉकलेट्सने १७ विद्यार्थ्यांना विषबाधा

अज्ञात व्यक्तीने शाळेच्या गेटवर दिलेल्या चॉकलेट्सने १७ विद्यार्थ्यांना विषबाधा

0 second read
0
0
213

no images were found

अज्ञात व्यक्तीने शाळेच्या गेटवर दिलेल्या चॉकलेट्सने १७ विद्यार्थ्यांना विषबाधा

नागपूर : येथील मदन गोपाल शाळेतील १७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. अज्ञात व्यक्ती शाळेच्या गेटवर आला आणि माझा वाढदिवस आहे, असं सांगून त्याने मुलांना खायला चॉकलेट्स दिली. बाधित विद्यार्थ्यांवर लता मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. तीन मुलं अत्यवस्थ असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.

अज्ञात व्यक्तीने शाळेच्या गेटवर येऊन माझा वाढदिवस आहे, असं सांगितलं आणि मुलांना खायला चॉकलेट्स दिली. त्यानंतर त्यातील १७ मुलांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तीन मुलं अत्यवस्थ असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. चॉकलेट देणारा व्यक्ती कोण होता? याचा तपास आता पोलिस करीत आहेत. अशा प्रकारे चॉकलेट देऊन लहान मुलांना भलतंच काहीतरी खायला दिल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. कुणीही काही खायला दिलं तरी खाऊ नये, असं पालकांनी मुलांवर बिंबवणं गरजेचं आहे.असे पोलिसांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…