
no images were found
परिवा प्रणती म्हणाली, “सुमितचे सुमधुर गायन ऐकण्यासाठी आम्ही सगळे त्याच्या मेकअप रूममध्ये गोळा होतो”
वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से मालिकेच्या केंद्रस्थानी वागले कुटुंबाची कहाणी आहे. दैनंदिन संघर्षाशी लढा देणाऱ्या एका आशावादी सामान्य माणसाची ही गोष्ट आहे. गेल्या तीन वर्षांपासून एकत्र काम करत असल्याने यातील कलाकारांचे देखील सेटवर एक कुटुंबच तयार झाले आहे. राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन या सगळ्या कलाकारांना आणि इतर मंडळींना एकत्र आणण्याचे काम करत असतो आणि त्याच्यामुळे सेटवर सगळ्यांचा वेळ काही तरी चांगल्या उपक्रमात व्यतीत होतो.
ज्यावेळी शूटिंग चालू नसते, तेव्हा सुमितची मेकअपची खोली म्हणजे एक सुरेल स्वर्गच असतो! जिकडे सुर आणि हास्य यांची मैफल रंगलेली असते. या खोलीत अशीच अचानक बैठक जमते, सगळे कलाकार गोळा होतात, सुमितच्या हातात हार्मोनियम असते आणि सगळेजण सुमधुर शास्त्रीय संगीतात किंवा बॉलीवूड गीतांच्या सुरात रंगून जातात. अशा गाण्याच्या रंगतदार मैफलीव्यतिरिक्त सुमितच्या या खोलीत वाढदिवस देखील साजरे होतात आणि स्पॉट दादांपासून, वॉचमन आणि क्रूसदस्यांपर्यंत कोणीही उत्सवमूर्ती असू शकते! पडद्याच्या मागची ही प्रगाढ मैत्री आणि दृढ नाते कलाकारांच्या पडद्यावरील परफॉर्मन्समध्ये देखील झळकते आणि त्यामुळे प्रत्येक दृश्यात अस्सल भावना अभिव्यक्त होतात आणि एक गोड कुटुंब आपल्याला दिसते.
राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “मालिकेला तीन वर्षे झाली आहेत. अशा प्रकारे मोठा काळ आम्ही सगळ्यांनी सेटवर एकत्र व्यतीत केला आहे. खरं सांगायचं तर आपापल्या घरी आम्ही जेवढा वेळ असतो, त्यापेक्षा जास्त वेळ, आठवड्यातले सहा दिवस आम्ही इथे एकमेकांसोबत असतो. या मेकअप रूममध्ये सतत काही तरी धमाल सुरू असते आणि सगळ्यांना इथे गोळा व्हायला आवडते. या संगीताच्या मैफली केवळ मनोरंजक नसतात, तर सगळ्या कलाकारांना आणि क्रू सदस्यांना एकमेकांशी घट्ट जोडणाऱ्या असतात. आम्ही गातो, हसतो, एकमेकांना किस्से-कहाण्या सांगतो, ते सगळं पडद्यावर एक कुटुंब म्हणून आमच्या परस्पर नात्यातून प्रतिबिंबित होतं. अशा प्रकारे एकत्र आल्यामुळे आम्हाला मालिकेत आहोत तसे खरोखरच एक कुटुंब असल्याचा अनुभव मिळतो.”
वंदना वागलेची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “वागले की दुनियाच्या सेटवर आम्ही एका कुटुंबासारखेच असतो. जेव्हा कॅमेरा रोल व्हायचा थांबतो आणि शूटिंग संपल्यानंतर एक प्रकारचा शीण येतो तेव्हा आम्ही सगळे सुमितच्या मेकअप रूममध्ये, त्याचे सुरेल गाणे ऐकण्यासाठी गोळा होतो. त्याच्यात अनेक कला आहेत. आपल्या उत्साही व्यक्तिमत्वाने तो त्या खोलीचे वातावरण जिवंत करतो, त्यामुळे आमचा शीण जातो आणि आमच्यात एक प्रकारचे सख्यही निर्माण होते. वागले की दुनियाच्या सेट्सवर आमचे जे परस्परांशी नाते आहे, ते शब्दांत सांगता येण्याजोगे नाही. सुमित जेव्हाया हार्मोनियम वाजवू लागतो तेव्हा मनावरचा ताण आणि आख्ख्या दिवसाचा शीण गळून पडतो आणि त्या सुरांचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही त्याच्या खोलीत दाटी करतो.”