Home शैक्षणिक महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी साधला शास्त्रज्ञांशी संवाद

महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी साधला शास्त्रज्ञांशी संवाद

44 second read
0
0
20

no images were found

महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी साधला शास्त्रज्ञांशी संवाद

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रज्ञ डॉ.मोनाली सी. रहाळकर, डॉ.राजन कुराडे, डॉक्टर के. एल. लोहार या नामांकित शास्त्रज्ञांशी ऑनलाईन परिसंवाद साधला. प्रशासक के. मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या संकल्पनेतून बुधवारी भारतातील तीन नामांकित शास्त्रज्ञांशी शाळेतील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन संवाद घडवून आणला. यामध्ये महानगरपालिकेच्या 58 शाळा मधील जवळपास 10 हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञाशी परिसंवाद साधला.

            महानगरपालिकेच्या शाळेतील स्कॉलरशिप मध्ये प्राविण्य मिळविलेल्या 17 विद्यार्थ्याना महापालिकेच्यावतीने नुकतीच इसरोवारी घडवून आणली आहे. अन्य विद्यार्थ्यानाही शास्त्रज्ञांशी संवाद साधता यावा यासाठी शास्त्रज्ञ डॉ.मोनाली सी. रहाळकर, डॉ.राजन कुराडे, डॉक्टर के. एल. लोहार यांचेशी महापालिकेने संपर्क करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणेबाबत विनंती केली होती. त्यास प्रतिसाद देऊन राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.   

            यामध्ये सकाळी 11 ते 12 या वेळेत पहिल्या सत्रात शास्त्रज्ञ डॉ.मोनाली सी. रहाळकर यांनी जिवाणू, विषाणू व  ग्लोबल वॉर्मिंग आणि सध्या संपूर्ण जगाला भेडसावणारे साथीचे रोग या गंभीर प्रश्नावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. फार कमी शास्त्रज्ञ या जागतिक समस्यांच्या तळाशी जातात. डॉ. मोनाली रहाळकर या अशाच एक शास्त्रज्ञ आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी मिथेनोट्रॉफच्या सखोल अभ्यासासाठी पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आहे. तसेच भात शेतीमध्ये मनुष्याला अपायकारक जिवाणूवर संशोधन करून त्यावर मात्रा शोधली आहे. तसेच अलीकडे कोविड – 19 साथीचा रोगावर त्यांनी SARS-2 कोरोनाव्हायरसच्या उत्पत्तीचे संशोधन केले आहे. सकाळच्या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना जिवाणू बरोबरच विषाणू बाबत दैनदिन जिवनातील उदाहरणे देत सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी कोरोना, तापमान वाढ बाबतचे विविध प्रश्न डॉ.मोनाली सी. रहाळकर यांना विचारले.

            दुसऱ्या सत्रात दुपारी 12 ते 1 यावेळेत नॅशनल ट्रायसोनिक एरोडायनॅमिक फॅसिलिटी विभागाचे वरिष्ठ मुख्य शास्त्रज्ञ डॉ.राजन कुराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पीपीटी द्वारे अंतराळ संशोधनात कार्य केलेल्या विविध शास्त्रज्ञांचा परिचय विद्यार्थ्यांना करुन दिला.  तसेच विमान कसे तयार झाले ? ते विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, विद्यार्थ्यांनी डॉ.राजन कुराडे यांना विमानासाठी लागणारे इंधन व धातू याबाबत प्रश्न विचारले. यावेळी डॉ कुराडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

            तिसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता चंद्रयान-3 मोहिमेतील डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आणि सीनियर सायंटिस्ट डॉक्टर के. एल.  लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी नुकत्याच झालेल्या महत्त्वकांक्षी चंद्रयान तीन या मोहिमेत ज्यांनी सकारात्मक भाग घेतला. या मोहिमेत डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले. यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांशी संवाध साधून चंद्रयान तीन या मोहिमेचा अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केला. तसेच या मोहिमेतील काही व्हिडिओ व प्रेझेंटेशन त्यांनी मुलांना दाखविले. चंद्रयान तीन मोहिमेमध्ये झालेल्या अनेक रहस्यंचा उलघडाही यावेळी केला.

            यावेळी या तीन्हीं शास्त्रज्ञांना विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले. यामध्ये चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करणे शक्य आहे का ? ,भारतीय चंद्रयान मोहिमेला इतर प्रदेशांच्या पेक्षा कमी खर्च का आला ?,  कॅन्सर हा आजार विषाणूमुळे होता का? , कोरोना सध्या संपला आहे का ?, माणसालाही चंद्रावर राहता येईल का ?, रॉकेटला वरती जाण्यासाठी शक्ती कशी निर्माण होते ?,  वैज्ञानिक होण्यासाठी कोणती शिक्षण घ्यावे लागते ?, सॅटॅलाइटची लांबी, रुंदी किती असते ? असे विविध प्रश्न विचारले.  या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने सर्व महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा शास्त्रज्ञांशी संवाद घडवून आणून भावी शास्त्रज्ञांना प्रेरित केले आहे. प्रशासनाधिकारी एस.के यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, कार्यक्रम अधिकारी रसुल पाटील, तंत्रस्नेही नेताजी फराकटे, सुभाष माने व सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तर सर्व मुख्याध्यापक, सर्व शैक्षणिक पर्यवेक्षक, तंत्रस्नेही, शिक्षक, शिक्षिका यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…