no images were found
एअरटेलने आयडीईएमआयए सोबत भागीदारी करून रिसायकल केलेले पीव्हीसी सिम कार्ड लाँच केले
गुरुग्राम : भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेल ने आज घोषणा केली की त्यांनी व्हर्जिन प्लॅस्टिकपासून बनवलेल्या सिमकार्डऐवजी रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून बनविलेले सिम कार्ड लॉन्च केले आहे. कंपनीने यासाठी आयडीईएमआयए सिक्योर ट्रान्झॅक्शन सोबत भागीदारी केली आहे. एअरटेल नेहमीच इको-फ्रेंडली आणि जबाबदार सर्क्युलर बिजनेस पद्धतींचा अवलंब करण्यासाठी वचनबद्ध आहे. या संदर्भात, एअरटेल ने आयडीईएमआयए सिक्योर ट्रान्झॅक्शन सोबत भागीदारी केली आहे, जो आयडीईएमआयए ग्रुपचा भाग आहे. हा ग्रुप वित्तीय संस्था, मोबाइल नेटवर्क ऑपरेटर आणि ऑटोमोटिव्ह उत्पादकांसाठी पेमेंट आणि कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स प्रदान करतो.रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेले सिम कार्ड लॉन्च करणारी एअरटेल ही भारतीय दूरसंचार उद्योगातील पहिली दूरसंचार कंपनी ठरली आहे. आता सिमकार्ड बनवण्यासाठी व्हर्जिन प्लॅस्टिकऐवजी रिसायकल केलेले प्लास्टिक वापरले जाणार आहे. या बदलामुळे एका वर्षात 165 टनपेक्षा जास्त प्लास्टिकचा वापर कमी होईल. याशिवाय 690 टन पेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जनही कमी होईल.हा बदल पर्यावरण संरक्षणासाठी एअरटेलच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे आणि कंपनीने या दिशेने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. एअरटेल ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्याच्या नवीन पद्धतींवर काम करत आहे यासाठी, कंपनी आपल्या सप्लायर्स आणि इतर व्यावसायिक भागीदारांसोबत काम करत आहे जेणेकरुन त्यांना देखील पर्यावरण संरक्षणासाठी काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.
पंकज मिगलानी, डायरेक्टर, सप्लाय चेन, भारती एअरटेल म्हणाले, “भारतीय दूरसंचार उद्योगात आघाडीवर असताना आम्ही आणखी एका उपक्रमाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. एक ब्रँड म्हणून, आम्ही पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध शाश्वत उपायांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो आणि भारताचे नेट झिरो लक्ष्य साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो. आयडीईएमआयए सोबतचे आमचे सहकार्य हा एक शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुरावा आहे.
राहुल टंडन, सीनियर वाइस प्रेसिडेंट–कनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस, इंडिया, आयडीईएमआयए सिक्योर ट्रान्झॅक्शन, म्हणाले, “एअरटेलसोबतच्या आमच्या दीर्घकालीन भागीदारीचा आम्हाला अभिमान आहे. भारतात कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात आणि ग्राहकांना ग्रीन सोल्यूशन्स प्रदान करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल आम्ही एअरटेलचे अभिनंदन करतो. अशा नवकल्पना शक्य केल्याबद्दल मी आमच्या सर्व रिसर्च आणि डेव्हलपमेंट टीमचे आभार मानू इच्छितो.
2020-21 च्या आधारे, एअरटेलचे आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत त्याच्या सर्व ऑपरेशन्समध्ये स्कोप 1 आणि 2 ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन 50.2% ने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनीने त्याच वेळेत पूर्ण स्कोप 3 ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन 42% ने कमी करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, एअरटेल पर्यावरण संरक्षणासाठी अनेक गोष्टी करत आहे. कंपनी ऊर्जा संरक्षण, ग्रीन एनर्जीचा वापर आणि कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांचे नेटवर्क हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करू शकेल याचीही खात्री ते करत आहेत.कार्बन डायऑक्साइड समतुल्य हे एक प्रमाण आहे जे आपल्याला विविध ग्रीनहाऊस गॅस (जीएचजी) ग्लोबल वार्मिंगमध्ये किती उष्णता निर्माण करतात याची माहिती देते. हे कार्बन डायऑक्साइडच्या समतुल्य प्रमाणात मोजले जाते.