
no images were found
वयाच्या १५ व्या वर्षी डिप्रेशनमध्ये गेलेली अभिनेत्री; आज गाजवतेय इंडस्ट्री !
बॉलिवूडच्या झगमगत्या इंडस्ट्रीमागे अनेक रहस्य दडलेली असतात. काही काळानंतर जेव्हा अशी रहस्य बाहेर येतात तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. अनेक वर्षांनी असाच धक्कादायक खुलासा झालाय. जेव्हा एका सीनदरम्यान अभिनेत्रीला हिरोने जबरदस्ती किस केलं. त्यानंतर अवघ्या १५ वर्षांची ती अभिनेत्री सदम्यात गेलेली. पण नंतर प्रचंड मानसिक धक्का पचवत त्या अभिनेत्रीने इंडस्ट्रीवर राज्य केलं. कोण होती ती अभिनेत्री?
हा किस्सा घडलेला अभिनेत्री रेखाच्या बाबतीत. साल १९६९.. रेखाच्या फिल्मी कारकीर्दीची नुकतीच सुरुवात होती. ती अवघ्या १५ वर्षांची होती. अशातच रेखाने ‘अंजाना सफर’ ज्याचं नाव पुढे ‘दो शिकारी’ असं ठेवलं गेलं, या सिनेमातला एक धक्कादायक किस्सा रेखाने तिच्या आत्मचरित्रात सांगितला आहे. एका रोमँटिक सिनेमाच्या वेळी बंगाली सुपरस्टार बिस्वजीत चॅटर्जींनी सीन करता करताच रेखाला किस केलं. रेखाला याची अजिबात कल्पना नव्हती. दिग्दर्शक कुलजित पाल यांनीही शॉट कट केला नाही. त्यामुळे रेखाला प्रचंड धक्का बसला आणि ती सेटवरच रडली.
ही घटना घडल्यानंतर अभिनेते विश्वजीत यांनी एका मुलाखतीत या घटनेचा खुलासा करत म्हणाले, “मला दिग्दर्शकाने जे सांगितलं ते मला करायचं होतं. त्या रोमँटिक सीनला मला न्याय द्यायचा होता.” पुढे हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांकडून सिनेमाला चांगली पसंती मिळाली. याशिवाय रेखा आणि विश्वजीतची जोडीही लोकप्रिय ठरली.