no images were found
डीकेटीईचे वार्षिक स्नेहसंमेलन – ‘शिवशक्ती‘ उत्साहात संपन्न
इचलकरंजी – डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे वार्षिक स्नेहसंमेलन हे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने संपन्न होत असते या वर्षीच्या शिवशक्ती २०२४ हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे काशिनाथ देवधर (रिटायर्ड ग्रुप डायरेक्टर ऑफ एआरडीई, पुणे) यांच्या उपस्थितीत विविध बक्षिस वितरणाने संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डीकेटीईच्या शिवशक्ती २०२४ या वार्षिक स्नेहसंमेलनात काशिनाथ देवधर बोलताना म्हणाले, डीकेटीईचे शिक्षण पध्दतीमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे उदयोग जगतास पूरक असे प्रॅक्टीकल नॉलेज यामुळे येथील विद्यार्थी हा सक्षम अभियंता बनत असून डीकेटीईचे नाव जगाच्या पटलावर अधोरेखीत करीत आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीमधील अनेक घटनांचा उल्लेख केला. या अधुनिक भारताची संरक्षण क्षेत्रामधील भक्कम स्थितीचा आवर्जून उल्लेख केला त्याचबरोबर त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या बरोबर काम करीत असताना आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले धडे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कोणत्याही परिस्थीतीमध्ये कधीही माघार घेवू नये असा मोलाचा मंत्र दिला. हे सांगत असताना प्रत्येक वेळी त्यांचा देशाबदलचा अभिमान प्रकर्षाने जाणवत होता.
प्र.संचालिका प्रा. डॉ. सौ. एल.एस. आडमुठे यांनी स्वागत करुन संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेेतला यावेळी बोलताना सद्य स्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच घ्यावयाची अद्यावत प्रशिक्षणाबाबत माहिती सांगून उत्तम भवितव्य घडण्यासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन केले. यावेळी विविध स्पर्धेचा निकाल डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील व डीन प्रा. डॉ. एस. के. शिरगांवे यांनी जाहीर केला. विद्यार्थी प्रतिनिधी स्वालेहा मेस्त्री हीने वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमास ट्रस्टी एस.डी.पाटील, तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास सोशल डीन प्रा. एस.जी. कानिटकर, सोशल विभागप्रमुख प्रा. ए. व्ही. शहा, प्रा. ए.आर.बलवान प्रा. ए.यु. अवसरे, यांचेसवे सर्व डीन, विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी मांडवी दुबे, आनंद मॉल यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर अदित्य बिडवे यांनी आभार मानले.