Home सामाजिक सुळकुड पाणी योजनेबाबत शासनाकडे मंत्रालयात बैठकीचे आयोजन

सुळकुड पाणी योजनेबाबत शासनाकडे मंत्रालयात बैठकीचे आयोजन

0 second read
0
0
109

no images were found

सुळकुड पाणी योजनेबाबत शासनाकडे मंत्रालयात बैठकीचे आयोजन

कोल्हापूर(प्रतिनिधी) : इचलकरंजीच्या दूधगंगा सुळकुड पाणी योजनेबाबत शासनाकडे मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्यानंतर मंगळवारी कागल तालुक्यातील महिलांच्या उपोषणाची सांगता झाली.इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजना मंजूर झाली आहे. या पाणी योजनेच्या मागणीसाठी इचलकरंजीतील आम्ही सावित्रीच्या लेकी या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले होते. तर या योजनेला विरोध करत कालपासून कागल तालुक्यातील आम्ही जिजाऊंच्या लेकी या मंचाखाली सुळकुड बंधाऱ्यावर आंदोलन सुरू केले होते.
दरम्यान, या प्रश्नी आज पालकमंत्री मुश्रीफ यांनी लक्ष घातले. त्यांनी विधिमंडळातून आंदोलक महिलांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. कागल सुळकुड योजना होऊ दिली जाणार नाही. इचलकरंजीला पर्यायी पाणी योजना दिली जाईल आणि या प्रश्नी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यांच्याशी पंचायत समितीच्या माजी सभापती राजश्री माने,सरपंच वीरश्री जाधव यांनी संपर्क साधला. या महिलांनाही मंत्रालयातील बैठकीसाठी पाचारण करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, युवराज पाटील, भैया माने यांच्यासह आंदोलन उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …