Home राजकीय राहुल गांधींच्या ‘त्या’ कृतीचं संजय राऊतांनी केलं समर्थन

राहुल गांधींच्या ‘त्या’ कृतीचं संजय राऊतांनी केलं समर्थन

2 second read
0
0
41

no images were found

राहुल गांधींच्या त्याकृतीचं संजय राऊतांनी केलं समर्थन

 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेचं सदस्यत्व परत मिळाल्यानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर बोलताना परखड शब्दांत टीका केली.

मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे असं म्हणतानाच जोपर्यंत तुम्ही मणिपूरमधला हिंसाचार थांबवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही भारतमातेचे खुनी असाल, असंही राहुल गांधी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले.

 मात्र, या भाषणापेक्षा त्यांनी लोकसभेतून जाताना केलेल्या एका कृतीची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. लोकसभेतून बाहेर पडताना राहुल गांधींनी सत्ताधारी बाकांकडे बघून ‘फ्लाइंग किस’ दिल्याचा दावा मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. यावरून सध्या भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

त्यांच्या या कृतीविरोधात भाजपाच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करणारं पत्रही सादर केलं आहे. मात्र, राहुल गाधींच्या त्या कृतीचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे.

“भाजपा कधी कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन करेल, राजकारण करेल हे सांगता येत नाही. जंतरमंतरला महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसल्या होत्या तेव्हा कुणी तिथे गेलं नव्हतं. राहुल गांधींनी द्वेष, सूड यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला.

जादू की झप्पी म्हणतो तसं जादू का फ्लाइंग किस. या ‘मोहोब्बत की दुकान’मधलं ते एक महत्त्वाचं शस्त्र आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी असे अनेक फ्लाइंग किस जनतेला, देशाला दिले आहेत. पण ज्यांना ममत्व उरलेलं नाही, त्यांना फ्लाइंग किस म्हणजे काय हे समजणार नाही”, असं म्हणत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…