
no images were found
एचडीएफसी बँके तर्फे ‘पुरानी गाडी, नयी शुरुआत’ उपक्रमाची सुरुवात
9 ऑगस्ट २०२३ : एचडीएफसी बँके तर्फे पुरानी गाडी नयी शुरुआत या राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. ७ ऑगस्ट २०२३ पासून आठवडाभर सुरु राहणार्या या मोहिमेच्या माध्यमातून युज्ड व्यावसायिक वाहने आणि युज्ड बांधकाम उपकरणांच्या खरेदीसाठी वाहतूकदार आणि कंत्राटदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून एचडीएफसी बँकेकडून देशभरांतील ग्रामीण आणि निमशहरी भागातील अंदाजे ५०,००० वाहतूकदार, कंत्राटदार आणि मध्यस्थां पर्यंत पोहोचण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात सुरु असलेल्या या मोहिमे अंतर्गत बंगळूरू, कोलकाता, अहमदाबाद, मुंबई, जयपूर, चेन्नई, प्रयागराज, हैद्राबाद, इंदूर, चेन्नई, दिल्ली, वडोदरा, कोची, जोधपूर, पुणे, लुधियाना आणि कर्नाल सहीत अन्य शाखांमधून ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
या आठवड्या मध्ये एचडीएफसी बँके कडून छोट्या आणि मोठ्या प्रमाणावरील विविध वाहतूक हब्स मध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यामुळे व्यावसायिक वाहन वित्तीय सेवा क्षेत्रातील बँकेचा बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
एचडीएफसी बँकेच्या कमर्शियल आणि रुरल बँकिंग चे ग्रुप हेड राहूल एस शुक्ला यांनी सांगितले “ या उपक्रमासाठी आम्ही खूपच उत्साही आहोत, या उपक्रमात बँकेचे अधिकारी दुर्गम भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील. या उपक्रमा मुळे आता अनेक चालकांना ट्रकचा मालक होण्याची अनोखी संधी प्राप्त होणार आहे.”
एचडीएफसी बँकेच्या ट्रान्सपोर्टेशन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स चे ग्रुप हेड राजिंदर कुमार बब्बर यांनी सांगितले “ यामुळे बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मदत होईल आणि त्याच बरोबर या क्षेत्रातील बाजारपेठेचा हिस्सा ही वाढवता येईल. या विभागातील अधिकतर कर्जे ही प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग साठी पात्र आहेत.”
एचडीएफसी बँक ही व्यावसायिक वाहतूक क्षेत्रातील आघाडीची खेळाडू आहे, आणि गेल्या २० हून अधिक वर्षांपासून बँके कडून युज्ड व्यावसायिक वाहने आणि युज्ड बांधकाम उपकरणांसाठी कर्जे उपलब्ध करुन देत आहे.