Home मनोरंजन सृष्टी जैन साकारणार आहे आपली पहिली खलनायकी भूमिका

सृष्टी जैन साकारणार आहे आपली पहिली खलनायकी भूमिका

11 second read
0
0
25

no images were found

सृष्टी जैन साकारणार आहे आपली पहिली खलनायकी भूमिका

 

गेली 9 वर्षे झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’ने आपल्या रोचक आणि नाट्‌यमय कथानकासह प्रेक्षकांना आपल्या खुर्चीला खिळवून ठेवले आहे. एकमेकांपासून विलग झालेली जोडी रणबीर (कृष्णा कौल) आणि प्राची (मुग्धा चाफेकर), त्यांच्या मुली खुशी (सिमरन बुधारूप), पूर्वी (राची शर्मा) आणि राचीचा पती राजवंश (अब्रार काझी) यांच्या जीवनप्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हल्लीच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की कसे पूर्वीसोबत लग्न होण्याच्या आधीपासूनच राजवंशचे खुशीसोबत संबंध आहेत. आणि खुशीने त्याला नाराज केल्यामुळे तिच्या आयुष्यात उत्पात निर्माण करण्याचा राजवंशचा वाईट हेतू आहे आणि त्यासाठी तो खुशीची बहिण पूर्वीला आपले सावज बनवतो.

मोनिषा ह्या नवीन व्यक्तिरेखेच्या प्रवेशामुळे मालिकेमध्ये आता रोमांचक वळण येणार आहे. मोनिषाची भूमिका गुणी अभिनेत्री सृष्टी जैन साकारणार आहे. खलनायकी भूमिका सृष्टी प्रथमच साकारत असून तिच्या प्रवेशामुळे कथानकामध्ये नवीन उत्कंठा आणि गूढ निर्माण होईल. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पडद्यावरील उत्तम उपस्थितीसाठी मानल्या जाणाऱ्या सृष्टीने आपल्या रहस्यमयी भूमिकेला अगदी जीवंत केले असून कथानकामध्ये जटिलतेचा आणखी एक स्तर निर्माण केला आहे.

सृष्टी जैन म्हणाली, मी प्रथमच खलनायकी भूमिका साकारत असून हे माझ्यासाठी एक नवीन आणि रोमांचक आव्हान आहे. माझ्यातील कलाकाराच्या कलेचा नवीन पैलू उलगडून पाहण्याची संधी मला मिळाली यासाठी मी आभारी आहे. माझ्या प्रवेशासह प्रेक्षक अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करू शकतात आनि अर्थातच त्यामुळे मालिकेत रहस्यमयी नाट्‌यमय वळणे येतील. माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर मोठा प्रभाव निर्माण करेल आणि माझ्या परफॉर्मन्ससह सर्वांचे मन जिंकण्याचा माझा मानस आहे.

‘कुमकुम भाग्य’ मालिका आता सृष्टी जैनसोबत चित्रीकरण सुरू करत आहे. ही व्यक्तिरेखा कशी असेल आणि ह्या मालिकेत कशाप्रकारे नाट्‌यमय वळणे येतील हे जाणून घेण्याची उत्कंठा सध्या खूप आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…