
no images were found
मिलेट महोत्सवामध्ये सतरा लाखांची उलाढाल – बसवराज बिराजदार
कोल्हापूर : चार दिवसीय मिलेट महोत्सवामध्ये रुपये सतरा लाखांची उलाढाल झाली असल्याचे कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी सांगितले. श्री. बिराजदार म्हणाले, नवीन पिढी ने तृणधान्याचे महत्त्व विचारात घेऊन आपल्या आहारामध्ये तृणधान्याचा वापर वाढवला पाहिजे. कृषी पणन मंडळांनी शेतकऱ्यांना एक चांगली व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि त्याचा फायदा होत असल्याचे नमूद केले. उपस्थित स्टॉल धारकांनी कृषी पणन मंडळाने अतिशय चांगले नियोजन केल्या बद्दल कृषी पणन मंडळाचे आभार व्यक्त केले.
मिलेट महोत्सवामये नाचणीची बिस्किट, चिवडा, नाचणीचे पीठ, सोलापुरी ज्वारीच्या भाकरी, असे तृणधान्याचे विविध प्रकार या महोत्सवांमध्ये कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मिलेट महोत्सवाची आज सांगता झाली. महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या स्टॉल धारकांचा सत्कार कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सांगवडे येथील शासनाचा शेती निष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी महादेव टेळे यांचा सत्कार करण्यात आला, चार दिवसीय मिलीट महोत्सवास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी महाराष्ट राज्य कृषि पणन मंडळांचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, अनुप थोरात,प्रतिक गोनुगडे, प्रसाद भुजबळ, ओंकार माने, सुयोग टाकले, सत्यजीत भोसले, अनिल जाधव, किरण जाधव,पुजा धोत्रे,संदेश पिसे,रविंद्र शेलार आदी उपस्थित होते.