no images were found
मासे पकडण्यासाठी टाळलेल्या जाळ्यात स्वत:च अडकून तीन मच्छिमारांचा अंत
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तीन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मच्छिमार जाळे काढण्यासाठी गेले असताना त्यांचा मृत्यू झाला. तीन मच्छिमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले होते.
तीनही मच्छिमार तिवसा तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळतात तहसीलदार वैभव फरतारे घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले असून मच्छिमारांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. स्थानिक शेतकरी सकाळी १० च्या सुमारास शेतावर गेला होता. त्यावेळी हा प्रकार त्याच्या लक्षात आला. तीन मच्छिमारांनी जाळे नदीतून बाहेरुन काढण्यासाठी उड्या घेतल्या. ते पोहत पोहत कोपऱ्यात गेले आणि बुडू लागले. शेतकऱ्याने ही बाब शेजारच्या शेतात काम करणाऱ्यांना सांगितली. त्यानंतर त्याने हा प्रकार मुलाच्या कानावर घातला. मुलाने नगर पंचायतीशी संपर्क साधला. यानंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र अद्याप तरी एकही मृतदेह हाती लागलेला नाही.