no images were found
ऑक्टोबरपासून राजधानी एक्सप्रेसमध्ये इकॉनॉमी डबे लावणार
नवी दिल्ली : देशभरातील रेल्वे प्रवाशांना ही आनंदाची बातमी आहे. प्रवाशांना आता कमी किमतीत एसी कोचमधून प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे. रेल्वेने आपत्कालीन कोट्यात दिलेल्या तीन बर्थचाही या योजनेत समावेश केला जाणार आहे. रेल्वे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या गाड्यांमध्ये AC-3 इकॉनॉमी कोच बसवले जाणार त्यामध्ये आरक्षणासोबतच प्रवाशांना विशेष सुविधा मिळणार आहेत.
भारतीय रेल्वे प्रशासन ऑक्टोबरपासून रेल्वे 50 ट्रेनमध्ये AC-3 इकॉनॉमी कोच बसविण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी खर्चात लक्झरी सुविधा असलेल्या रेल्वेमधून प्रवास करण्याचा लाभ मिळणार आहे. लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांमधील इकॉनॉमी डब्ब्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. आता स्लीपर क्लासचे डबे एसी-3 इकॉनॉमीमध्ये बदलण्याची तयारी रेल्वेकडून सुरू आहे.
भोपाळ-जयपूर एक्सप्रेस, तेलंगणा एक्सप्रेस, जीटी एक्सप्रेस, कर्नाटक एक्सप्रेस, एपी एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस, दक्षिण एक्सप्रेस, समता एक्सप्रेस, छत्तीसगड एक्सप्रेस, अमरकंटक एक्सप्रेस, अमृतसर एक्सप्रेस, सचखंड एक्सप्रेस, अंदमान एक्सप्रेस, हिमसागर एक्सप्रेससह त्रिशूर एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
ज्या गाड्यांमध्ये इकॉनॉमी क्लासचे एसी-३ कोच बसवले जाणार आहेत. त्या गाड्यांच्या आरक्षण सीआरआयएसच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. 2024 च्या अखेरीस देशभरातील 67 टक्के ट्रेनमध्ये पहिल्या टप्प्यात स्लीपर कोचचे AC-3 इकॉनॉमी कोचमध्ये रूपांतर करण्याचे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट आहे.