no images were found
पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांचा वाढदिवस ; रक्तदान शिबिरापासून सेवा पंधरवडा कार्यक्रमास सुरवात
कोल्हापूर : देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. वाढदिवसाच्या निमित्याने भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात “सेवा पंधरवडा” म्हणून अनेक सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या सेवा पंधरवडा अभियानास सुरवात करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प्र.का.सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये छत्रपती शिवाजी मंदिर, अहिल्यादेवी होळकर विद्यालय याठिकाणी रक्तदान शिबिराचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. भाजपा युवा मोर्चाच्यावतीने शहरातील ७ मंडलामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देशाचे सक्षम, कणखर पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून शहरामध्ये जास्तीत जास्त सेवाकार्याचे कार्यक्रम घेऊन या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लोकांपर्यत सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहण्याचे आवाहन केले. आजच्या रक्तदान शिबिरासाठी को.म.न.पा.रक्तपेढी, अर्पण रक्तपेढीचे डॉक्टर आणि सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. भारतीय जनता परतीच्या माध्यमातून मंडल स्तरावर दिनांक ०२ ऑक्टोबर पर्यंत विविध सेवाभावी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
उद्या रविवार दिनांक १८ रोजी पाटील मंगल कार्यालय, टेंबलाईवाडी याठिकाणी सकाळी १० ते ०५ यावेळेत भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले असून याठीकाणी मोफत हृद्य रोग चिकित्सा व निदान, आयुष्यमान भारत गोल्ड कार्डन काढणे, बांधकाम कामगार नोंदणी व रक्तदान शिबिर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आण्णासो शिंदे विद्यालय, लक्षतीर्थ वसाहत येथे सकाळी १० ते ०२ यावेळेत रक्तदान शिबीर होणार आहे.
आजच्या कार्यक्रमावेळी राजू मोरे, प्रदीप पंडे, गिरीष साळोखे, हर्षवर्धन पाटील, विजय आगरवाल, पारस पलीचा, दिग्विजय कालेकर, गोविंद पांडीया, सुधीर देसाई, विजय दरवान, रोहित कारंडे, विवेक वोरा, सचिन आवळे, प्रताप देसाई, संग्राम जरग, अशोक लोहार, राजेंद्र वडगांवकर, सौरभ मालंडकर, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हर्डीकर, स्वाती कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.