no images were found
स्मार्टफोन २०३०पर्यंत गायब होणार ? : बिल गेट्स
मुंबई : येत्या काही वर्षांत स्मार्टफोनमध्ये बदल झालेला पाहायला मिळत आहे. आज, स्मार्टफोनमध्ये हाय-टेक कॅमेऱ्यांपासून ते सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि जलद चार्जिंग ते वायरलेस चार्जिंगपर्यंत प्रत्येक आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश केला जात आहे.
तंत्रज्ञान क्षेत्र खूप वेगाने विकसित होत आहे आणि स्मार्टफोन कंपन्या त्यात सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहेत. भविष्यात स्मार्टफोनच्या स्वरूपाबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, येणाऱ्या काळात स्मार्टफोन्स इतके हायटेक बनतील की ते गायब होतील. वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी स्मार्टफोनसाठी अशा तंत्रज्ञानाविषयी अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल. त्यांचा असा विश्वास होता की इलेक्ट्रॉनिक टॅटू स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. म्हणजेच भविष्यात स्मार्टफोनऐवजी इलेक्ट्रॉनिक टॅटू वापरता येणार आहे.
बिल गेट्सच्या म्हणण्यानुसार, भविष्यात स्मार्टफोनला खिशात घेऊन जाण्याची गरज भासणार नाही, तर स्मार्टफोन शरीरात इंटिग्रेट केला जाईल. म्हणजेच, स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक टॅटूमध्ये बदलेल. हे इलेक्ट्रॉनिक टॅटू केवळ लहान आकाराचे चिप असतील, जे मानवी शरीरात बसवले जातील.
तसेच नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही भविष्यातील स्मार्टफोनवर मत मांडले. २०३० पर्यंत, स्मार्टफोनच्या सामान्य इंटरफेसमध्ये मोठा बदल दिसून येईल. या वेळेपर्यंत 6G आले असेल आणि स्मार्टफोनऐवजी स्मार्ट चष्मा किंवा इतर तत्सम उपकरण वापरले जात असेल. पेक्काच्या मते, २०३० पर्यंत स्मार्टफोनशी संबंधित अनेक गोष्टी थेट शरीरात एकत्रित केल्या जातील.