no images were found
स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी च्या वतीने आज ३ रा मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी च्या वतीने शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी, ३ रा मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. मागील सलग दोन वर्षात यशस्वीरित्या अशा प्रोग्रामचे आयोजन नॅनोसायन्स विभागाने केलेले असून यावर्षी सदर प्रोग्रॅम चे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षीच्या प्रोग्रॅमची थीम “on “Waste to Wealth and Artificial Intelligence: Sustainable Practices for Climate Action” असून सदर प्रोग्राम मध्ये या क्षेत्रात काम करत असणाऱ्या विविध कंपन्यांबरोबरच काही संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांचे अशी एकूण सहा व्याख्याने होणार आहेत. पालापाचोळ्यांच्या कचऱ्यापासून विविध पॅकेजिंग मटेरियल तसेच इतर जैविक कचऱ्यापासून बायो सीएनजी ची निर्मिती व परिणामी पर्यावरणाचे संतुलन सारख्या विविध विषयांवर या कार्यक्रमात विस्तृतपणे चर्चा होणार आहे. या प्रोग्रॅम साठी या दोन कंपनीचे प्रायोजकत्व मिळालेले असून सदरचा प्रोग्राम, विविध कंपन्यांमधील संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबरोबरच सर्वसाधारण नागरिकांसाठीही उपयुक्त असून जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा व पर्यावरण पूरक उपक्रमात सक्रियपणे कार्य करण्यासाठी आद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी असे आवाहन स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागाचे संचालक, प्रा. (डॉ.) के. के. शर्मा यांनी केले आहे तसेच सलग तिसऱ्यांदा असा यशस्वी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) डी टी शिर्के व माननीय प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील यांच्याबरोबरच माननीय कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले