no images were found
चांगला लीडर होण्यासाठी चांगल्या गोष्टींचे फॉलवर व्हा – डॉ. डी. टी.शिर्के
पाचगणी (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ आणि बहाई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचगणी या ठिकाणी नेतृत्व कौशल्य विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलत असताना डॉ. शिर्के यांनी चांगला लीडर होण्यासाठी चांगल्या गोष्टींचे फॉलवर व्हा.चांगल्या करिअरसाठी अभ्यासक्रमा बाहेरील गोष्टी शिकाव्या लागतील.त्यासाठी नेतृत्व विकास कौशल्य विकास शिबीर महत्वाचे आहे.फक्त राजकीय क्षेत्रात नेतृत्व नसते.तर ते सर्व क्षेत्रात असते. स्वतःला आपल्या ध्येयापर्यंत घेवून जाण्यासाठी स्वतःला लीड करणे हे सुध्दा एका चांगल्या लीडरशीप चे गुण आहे. तरुणांमध्ये वाचन संस्कृती नष्ट होत आहे.यासाठी तरुणांनी आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचे साहित्य वाचायला सुरुवात केली पाहिजे. नेतृत्व विकास शिबीर हे भविष्याची नेतृत्व निर्माण करणारे शिबीर आहे असे मत डॉ.शिर्के यांनी व्यक्त केले.
यावेळी लेसन आझादी बोलत असताना नेतृत्व विकास कौशल्य ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.नेतृत्व निर्माण करण्यासाठी सातत्याने ऊर्जा तेवत ठेवावी लागते.या शिबीरामध्ये आपल्याला स्वतः ला ओळखण्याचा दृष्टिकोन निर्माण होईल असे मत व्यक्त केले.
या शिबीरासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.हे शिबीर तीन दिवसांचे असणार आहे.शिबीराचे हे अठरावे वर्ष सुरू आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन पराग तांदळे यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर, शिबीराच्या समन्वयक सौ.आडके उपस्थित होत्या.