no images were found
मुंबई पश्चिम रेल्वेवर आज, उद्या ब्लॉक
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वैतरणा यार्डातील क्रॉसओव्हर हटविण्याच्या कामाकरिता शुक्रवारी (ता. १६) दुपारी अप आणि डाऊन मार्गावर दोन तास ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील अनेक एक्स्प्रेसची वाहतूक विलंबाने होणार आहे; तर लोअर परळ रेल्वे स्थानकादरम्यान डिलाईल रोड उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर टाकण्यासाठी शनिवारी (ता. १७) रात्रीही चार तासांचा पॉवर आणि ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे अनेक लोकल रद्द; तर काही फेऱ्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे.
वैतरणा यार्डातील क्रॉसओव्हर हटवण्याच्या कामासाठी घेण्यात येणारा ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक दुपारी १.३५ ते ३.३५ वाजेर्यंत असणार आहे. या दरम्यान अवध, खान्देश, अहिंसा एक्स्प्रेस, सौराष्ट्र मेल ४० मिनिटे, पाटणा-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस ४० मिनिटे, भुज-वांद्रे टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस ३० मिनिटे, लोकशक्ती एक्स्प्रेस ३० मिनिटे, सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस २५ मिनिटे, एकता नगर-दादर एक्स्प्रेस २० मिनिटे आणि इंदूर-दौंड सुपरफास्ट एक्स्प्रेस २० मिनिटे उशिराने धावणार आहेत; तर लोअर परळ पुलावर दुसरे गर्डर टाकण्याचे काम शुक्रवारपासून होत आहे. या कामासाठी १७ सप्टेंबरला अप-डाऊन जलद आणि धीम्या सर्वच मार्गावर शुक्रवारी रात्री १.१० ते शनिवारी पहाटे ५.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
लोकल सेवेत बदल– ब्लॉक कालावधीत शुक्रवारी रात्री १२.३० ची बोरिवली-चर्चगेट, रात्री १.०५ ची विरार-चर्चगेट या धीम्या लोकल अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रल दरम्यान अतिरिक्त जलद लोकल म्हणून चालविण्यात येणार आहेत. पहाटे ४.१५ ची चर्चगेट-विरार धिमी लोकल पहाटे ४.३६ वाजता दादरहून, पहाटे ४.३८ची चर्चगेट-बोरिवली धीमी लोकल सकाळी ५.०८ वाजता वांद्रेहून सुटणार आहे. रात्री ३.२५ची विरार-चर्चगेट धिमी लोकल १५ मिनिटे उशिरा सुटणार आहे.
रद्द झालेल्या लोकल याप्रमाणे– रात्री १२.३१ चर्चगेट-अंधेरी, रात्री ०१.०० चर्चगेट-बोरिवली, पहाटे ४.४ अंधेरी-चर्चगेट, पहाटे ४.१९ चर्चगेट-बोरिवली, पहाटे ३.५० बोरिवली-चर्चगेट, पहाटे ५.३१ बोरिवली-चर्चगेट.