Home धार्मिक अष्टमीला करवीरनिवासिनी ची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा

अष्टमीला करवीरनिवासिनी ची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा

0 second read
0
0
82

no images were found

आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा आठवा दिवस महाअष्टमी तिथी आजच्याच दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रगटलेल्या अष्टादशभुजा महालक्ष्मी अर्थात दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. करवीरनिवासिनी महालक्ष्मी अर्थात परब्रम्हाची प्रधान प्रकृती. या रूपामध्ये जगदंबा फक्त देव मानव यांचीच नव्हे तर अगदी दैत्यांची सुद्धा माता आहे म्हणूनच हे सर्वजण तिला आदराने नमन करतात अशा परिस्थितीत मार्ग चुकलेल्या आपल्या मुलांसाठी आईला जसे प्रसंगी कणखर व्हावे लागते एरवीचे सोज्वळ रूप टाकून उग्र रूप घ्यावे लागते तसेच महिषासुरा सारख्या वाट चुकलेल्या पुत्रासाठी करूणामय जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे उग्र रूप घेतले शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्री आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले तेथे देवीने महिष मर्दिनीरूपाने विहार केला अशी आख्यायिका आहे त्याला अनुसरूनच नवरात्राच्या या अष्टमीला करवीरनिवासिनी ची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा बांधली जाते जगदंबा महिषासुरमर्दिनी आपल्या मनातल्या कामक्रोधादी विकारांचा संहार करून निर्मळ सोज्वळ भक्तीचे दान देवो हाच जगदंबा चरणी जोगवा.
श्री मातृ चरणार्विंदस्य दास प्रसन्न सशक्तिक

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …