no images were found
‘क्यूंकि… सास माँ, बहू बेटी होती है’मध्ये लोकप्रिय कलाकार मनिष गोयलचा प्रवेश
‘झी टीव्ही’वरील ‘क्योंकि… सास माँ, बहू बेटी होती है’ मालिकेने प्रसारित झाल्यापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘सास कभी माँ और बहू कभी बेटी नहीं हो सकती’ या सामान्य समजाला खोटा ठरविण्यासाठी अंबिका एक अभूतपूर्व निर्णय घेते. ती एका मुलीला दत्तक घेते, पण मुलगी म्हणून नव्हे, तर आपली भावी सून म्हणून. ही मुलगी सुनेच्या रूपात आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवील, अशी तिची यामागील अपेक्षा असते. या नाट्यपूर्ण मालिकेने प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासून टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवले आहे.
गेल्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की केसरशी (नाविका कोटिया) लग्न झाल्यावर सूरज (लक्ष खुराणा) तिच्यावर कसा सूड उगविण्याचा प्रयत्न करतो, कारण तिच्यामुळेच आपण लहानपणापासून आपण आपली आई अंबिका (मानसी जोशी-रॉय) हिच्या सहवासला मुकलो, असा त्याचा ठाम ग्रह झालेला असतो. केसर जिन्यावरून पडावी, यासाठी तो पायर््यांवर तेल ओतून ठेवतो. दुर्दैवाने त्याचे आजोबा नारन दादू (प्रदीप सोळंकी) हेच त्यावरून घसरून पडतात. या दुर्घटनेमुले त्याला आपला मुलगा धीरेनच्या मृत्यूची आठवम येते. त्याच्या मृत्युमुळे सर्वांच्या जीवनात कशी उलथापालथ झाली होती, याची त्याला आठवण येते. आता लोकप्रिय कलाकार मनिष गोयलच्या मालिकेतील प्रवेशानंतर प्रेक्षकांना मालिकेत काही नाट्यमय प्रसंग पाहायला मिळणार आहेत. मनिषने यात अंबिकाचा दिवंगत पती धीरेनची भूमिका साकारली आहे. त्याचे प्रसंग हे फ्लॅशबॅकच्या स्वरूपात दाखविले जातात. आगामी भागांमध्ये या नव्या व्यक्तिरेखेद्वारे आजवर अज्ञात राहिलेले एक गुपित उघड होणार आहे.
मनिष गोयल म्हणाला, “मी आता जवळपास 20 वर्षं या उद्योगात कार्यरत आहे. पण मी प्रथमच अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे जिचा मालिकेत आधीच मृत्यू झालेला आहे. ती व्यक्तिरेखा म्हणजे अंबिकाचा पती धीरेन राजगौर याची. एक अभिनेता म्हणून मला ही कल्पना फार वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटते. ही तशी पाहुण्या कलाकाराची भूमिका असली, तरी मी सुमारे तीन वर्षांनंतर टीव्हीच्या पडद्यावर परतत आहे. मानसी ही माझी खूपच जवळची मैत्रीण असल्याने तिच्याबरोबर भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. मी यापूर्वी दोन मालिकांमधून तिच्याबरोबर भूमिका साकारल्या आहेत. तेव्हापासून आमची मैत्री झाली आहे. माझ्या व्यक्तिरेखेमार्फत गेली 26 वर्षं गुप्त ठेवण्यात आलेलं एक गुपित आता उघड होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसेल.”
सूरज आणि अंबिका यांच्यातील नाते सुधारण्याचा नाविका कसोशीने प्रयत्न करीत असली, तरी हे गुपित सर्वांसमक्ष उघड झाल्यावर काय घडेल? अंबिका आपल्या कुटुंबाला एकत्र राखू शकेल?