Home स्पोर्ट्स भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग  या विषयावर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चासत्र व पोस्टर स्पर्धा

भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग  या विषयावर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चासत्र व पोस्टर स्पर्धा

4 second read
0
0
33

no images were found

भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग  या विषयावर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चासत्र व पोस्टर स्पर्धा

कोल्हापूर (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला (दि.25 जानेवारी) शिवाजी विद्यापीठात भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर चर्चासत्र व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रम कै. श्रीमती शारदाबाझ्र गोविंदराव पवार अध्यासन, राज्यशास्त्र विभाग, गांधी अभ्यास केंद्र व नेहरू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला. चर्चासत्राचे बीजभाषण आलोचना संस्था, पुणे यांच्या संचालक मेधा कोतवाल लेले यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. सुरूवातीला राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत केले. डॉ. भारती पाटील, समन्वयक कै. श्रीमती शारदाबाझ्र गोविंदराव पवार अध्यासन यानी चर्चासत्रामागील भुमिका स्पष्ट केली. डॉ. प्रल्हाद माने, समन्वयक, नेहरू अभ्यास केंद्र यांनी आभार मानले.
आपल्या बीजभाषणात मेधा कोतवाल लेले यांनी भारतातील स्त्री चळवळीमुळे, स्त्री संघटनांमुळे गेल्या 75 वर्षात स्त्रियांच्यासाठी कसे कायदे होत गेले याचा आढावा घेतला, मथुरा बलात्काराच्या घटनेनंतर स्त्री चळवळीने बलात्कारासंबंधी कायदे बदलण्यास भाग पाडले, तीच बाब लैंगिक छळाची किंवा कौंटुंबिक अत्याचाराची होती, असे त्या
म्हणाल्या. स्त्रियांचे राजकारण म्हणजे केवळ निवडणूकीचे राजकारण नव्हे तर स्त्रीजीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे राजकारण होय असे त्या म्हणाल्या.
त्यानंतरच्या दुसऱ्या सत्रात डॉ. जयश्री कांबळे यांनी पंचातींमधील स्त्री नेतृत्व याविषयावर तर डॉ. वैशाली पवार यांनी महाराष्ट्र विधान सभेद्वारे स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर मांडणी केली. स्त्री चळवळीच्या जेष्ठ कार्यकर्त्या छायाराजे यांनी या सत्राचे अध्यक्षस्थान भुषविले.
त्या नंतरच्या सत्रात डॉ. नेहा वाडेकर यांनी लोकसभेतील स्त्रियांचा सहभाग या विषयावर तर प्रा. डॉ. भारती पाटील यांनी स्त्रियांच्या आरक्षणाची वाटचाल या विषयावर मांडणी केली. या सत्रात डॉ. रविंद्र भणगे यांनी अध्यक्षस्थान भुषविले. चर्चासत्रात अंदाजे 250 प्रतिनिधी सहभागी झाले होते. या चर्चासत्राला जोडून याच विषयावर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात 95 विद्यार्थी सहभागी झाले. सदर पोस्टरर्सचे परिक्षण डॉ. प्रतिमा पवार, डॉ. सुभाष कोंबडे व डॉ. कविता वड्राळे यांनी केले. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लागला.

प्रथम क्रमांक :- लक्ष्मी धनपाल कोळी ,द्वितीय क्रमांक :- वरूण सुहास अमृते, तृतिय क्रमांक :- पुनम प्रकाश सुर्यवंशी , गायत्री प्रकाश सुर्यवंशी
प्राजक्ता आदिकराव सुर्यवंशी
उत्तेजनार्थ :- 1) रजनीगंधा राजाराम नायकवडी, उत्तेजनार्थ :- 2) मानसी भरत पोळ

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…