
no images were found
कोल्हापूर डाक विभागामार्फत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे 10 हजार कापडी पिशव्या सुपुर्द
कोल्हापूर: कोल्हापूर डाक विभागामार्फत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापुर यांना भक्तांना देण्यासाठी 10 हजार कापडी पिशव्या सुपुर्द करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र सर्कलचे चीफ पोस्टमास्तर जनरल किशन कुमार शर्मा, गोवा रिजन, पणजीचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, जिल्हाधिकारी अमोल येडगे, श्री यादगिरी ADPS मुंबई रिजन यांच्या हस्ते या कापडी पिशव्या प्रदान करण्यात आल्या.
अंबाबाई दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांनी प्लास्टिक पिशव्या न वापरता पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी डाक विभागातर्फे पिशव्या दिल्या जातात. हा कार्यक्रम कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सहाय्यक सचिव महादेव दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.