Home मनोरंजन सई ताम्हणकरने केले इंडस्ट्रीतील स्ट्रगलबद्दल भाष्य!

सई ताम्हणकरने केले इंडस्ट्रीतील स्ट्रगलबद्दल भाष्य!

0 second read
0
0
27

no images were found

सई ताम्हणकरने केले इंडस्ट्रीतील स्ट्रगलबद्दल भाष्य!

मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर सईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअऱ करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. चित्रपटाबरोबर सई आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.
तिने तिच्या करिअरबाबत अनेक खुलासे केले आहेत. सई म्हणाली, एका चित्रपटासाठी माझी निवड झाली होती. शुटिंगच्या दोन दिवस अगोदर मला कळालं की मला बदलण्यात आलं आहे. माझ्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे म्हणणं होतं. त्यानंतर मला खूप खचल्यासारखं वाटत होतं.”
सई पुढे म्हणाली, “जेव्हा आपल्या वाटत असतं की सगळं संपलं आहे. तर आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा की हा काळही सरणार आहे. मी ज्या परिस्थितीतून गेले त्या परिस्थितीने मला प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमची एकाग्रता कशी ढळू दयायची नाही हे शिकवलं. त्या दिग्दर्शकाला माझ्यात जी उणीव दिसली होती. लोकं त्याच गोष्टीसाठी माझे खूप कौतुक करतात.
सईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आत्तापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीबरोबर बॉलीवूडमध्येही सईने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे, येत्या २ फ्रेबुवारीला तिचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकरची प्रमुख भूमिका आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…