no images were found
आनंदाचे, भरभराटीचे पर्व दिवाळी आली
कोल्हापूर : आनंदाचे पर्व दिपोत्सव, म्हणजेच दीपावली
शुक्रवार दि. २१ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.
आज वसुबारसने दीपावलीचे आगमन झाले आहे. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभू दे…!
शनिवार दि. २२ ऑक्टोबर- धनत्रयोदशी असून धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत.
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो. धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो.
रविवार दि.२३ ऑक्टोबरला नरकचतुर्दशी आहे. सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा.
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो द्यावे. आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो,
आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो.
सोमवार दि.२४ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा.
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो. लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो दे.
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न होवू दे.
मंगळवार दि.२५ ऑक्टोबर पाडवा अर्थात बलिप्रतिपदा आहे.
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदै गोडवा यावा,
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो दे.
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहू देत.
बुधवार दि.२६ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे.
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे,
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे.
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जावो……