no images were found
पेट्रोनास टीव्हीएस वन मेक चॅम्पियनशीपसाठी २०२४ साठी प्रशिक्षण आणि निवड फेरी
बंगळुरू, : मोटरस्पोर्ट्सच्या उत्साही लोकांमधील प्रतिभेला जोपासण्यासाठी वचनबद्ध असलेल्या टीव्हीएस रेसिंगला चार दशकांच्या मजबूत रेसिंग परंपरा आहे. आता पेट्रोनास टीव्हीएस वन मेक चॅम्पियनशिपसाठी प्रशिक्षण आणि निवडीसह पुन्हा हा थरार घेऊन आली आहे. निवड फेरी जानेवारी, फेब्रुवारी आणि मे २०२४ दरम्यान चार प्रमुख शहरांमध्ये होतील. महत्त्वाकांक्षी महिला आणि धाडसी रायडर्स यासाठी अर्ज करू शकतात आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना वन मेक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची संधी मिळते.
टीव्हीएस रेसिंगने २०१६ पासून देशातील ७०० हून अधिक इच्छुक महिला रेसर्सना प्रशिक्षित केले आहे. आता महिला वर्गाच्या आठ आवृत्त्यांसाठी आणि रुकी श्रेणीच्या तिसर्या आवृत्तीसाठी प्रशिक्षण आणि निवड फेरी आयोजित करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. २०२२ पासून १८ वर्षाखालील देशातील ५० हून अधिक रुकी रेसर्सना प्रशिक्षित केल्यावर, आता आगामी प्रशिक्षण सत्राचे उद्दिष्ट तरुण रेसर्स आणि इच्छुकांना मोटरसायकल रेसिंगची आवड निर्माण करण्यासाठी संधी निर्माण करणे आहे.
यावेळी बोलताना टीव्हीएस मोटर कंपनीचे बिझनेस हेड – प्रिमियम आ.श्री विमल सुंबली म्हणाले की, “टीव्हीएस रेसिंग १९८२ पासून भारतातील मोटरस्पोर्ट्स संस्कृती वाढविण्यात एक पुढे आहे. आमच्या वन मेक चॅम्पियनशिपसह आम्ही सर्व जेंडर आणि वयोगटातील रेसिंग उत्साही लोकांसाठी त्यांच्या मोटरस्पोर्ट कारकीर्दीची सुरुवात करण्यासाठी एक डायनॅमिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ‘रेसिंगचा झेंडा कुणाशीही भेदभाव करत नाही’ या आमच्या मूळ तत्त्वज्ञानाने आम्ही २०१६ मध्ये महिला चॅम्पियनशिप सुरू करणारे पहिले ठरलो. आमची रुकी चॅम्पियनशिप ही टीव्हीएस रेसिंग फॅक्टरी रेसर बनण्याच्या शिडीवरील पहिली पायरी आहे. आम्ही एक सर्वसमावेशक कार्यक्रम तयार केलेला आहे ज्यामध्ये संपूर्ण समर्थन आणि ट्रॅक प्रशिक्षण समाविष्ट आहे. त्याचे मोटरस्पोर्ट समुदायाने मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे.