Home सामाजिक डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करणार : अजित पवार

डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करणार : अजित पवार

0 second read
0
0
38

no images were found

डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करणार : अजित पवार

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहुन समाजाला न्याय मिळवून द्यावा, डिजिटल मिडिया क्षेत्राला प्रिंट मिडिया प्रमाणे स्वंतत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले, कोल्हापूर श्री सिद्धगिरी कणेरी मठ येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महाअधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार हजार डिजिटल मिडिया क्षेत्रातील संपादक पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
या अधिवेशनासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. प्रारंभी अधिवेशनाचे उदघाटन करवीर नगरीचे शाहू महाराज छत्रपती ,राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ,आयुष्यमान भारतचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे,खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य संघटक तेजस राऊत ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील,उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के,कोल्हापूर शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर,जिल्हा सचिव धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्यभरातुन आलेल्या संघटनेच्या २ हजार संपादक प्रकारांच्या उपस्थितीत अधिवेशन संपन्न झाले.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया माध्यमातून योगदानाबद्दल राजा माने यांचे विशेष कौतुक केले. आयुष्यात आलेल्या संकटांना संधी मानून आपल्याबरोबरच ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या पत्रकार बांधवाला न्याय देण्यासाठी संघटना निर्माण केली आहे.राजा माने यांच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे काम कौतुकास्पद असून डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवाची एक सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून निर्मिती करावी यामध्ये आम्हाला सहभागी करून ट्रस्ट विश्वस्त यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून पत्रकारांच्या कल्याणासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू यामध्ये पत्रकार कुटुंब कल्याण ,आरोग्य शिक्षण पत्रकारांसाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून न्याय मिळवून देणार असल्याचे चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक म्हणाले, डिजिटल मीडिया पत्रकार संघटना देशातील एकमेव डिजिटल संघटना असून याचे राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतभर याचा आपण विस्तार करावा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पाच हजार सदस्यांनी एकामेकाला सहकार्य करुन सबस्क्राईबवर एकमेकांना फॉलो करत बघणाऱ्याची संख्या वाढवली तर खऱ्या अर्थाने गुगलच्या माध्यमातून आपणास आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग मिळेल व खऱ्या अर्थाने पत्रकार व संघटना बांधणीचाही उद्देश सफल होईल.डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे कौतुकास्पद असून राजा माने यांच्या कार्यास आपला सदैव पाठिंबा असून डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या कार्याला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार धेर्यमाने यांनी डिजिटल मिडिया क्षेत्रातील पत्रकारांना मार्गदर्शन करीत भविष्याचा वेध घेऊन सकारात्मक पत्रकारीता करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोक मुलाखत प्रसिद्ध अभिनेते निर्माता दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी घेतली, यावेळी बोलताना अजित पवार यांनी मुलाखतीत रोख ठोक भूमिका स्पष्ट करीत महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते महायुतीच्या पाठिंबा पर्यंतच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.प्रिंट मिडिया डिजिटल मीडिया एकच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहुन समाजाला न्याय मिळवून द्यावा डिजिटल मिडिया क्षेत्राला प्रिंट मिडिया प्रमाणे स्वंतत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा महाराष्ट्र महागौरव डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र महा गौरव पुरस्कार वर्षाताई लांजेवार (चंद्रपूर), प्रा.शिवराज मोटेगावकर (लातूर), तुकाराम कुंदकुरे (छत्रपती संभाजी नगर), विकास थोरात (सातारा), विद्याताई पोळ (कोल्हापूर), डॉ. प्रियाताई शिंदे व डॉ.अरुणाताई बर्गे (सातारा), निखिल वाघ (पुणे), भारती चव्हाण (सांगली), प्रवीण माळी (सांगली), शशिकांत धोत्रे (सोलापूर),डॉ. राहुल कदम (पुणे), प्रकाश अवताडे (सांगली), नलिनी गायकवाड (पुणे )यांना सन्मानित करण्यात आले, यासह डिजिटल स्टार महा गौरव पुरस्कार कृष्णराज महाडिक (कोल्हापूर), संजय कांबळे (पुणे) व नागनाथ सुतार (पंढरपूर) यांना सन्मानित करण्यात आले.
राज्यभरातून आलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यम या विषयावर छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे – पवार, सायबर कोल्हापूरचे डॉ. राजेंद्र पारिजात, दैनिक पुढारी कोल्हापूरचे डिजिटल एडिटर मोहसीन मुल्ला, सोलापूर विद्यापीठाचे जनसंवाद विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार सुतार यांनीराज्यभरातून ३१ जिल्ह्यातून आलेल्या दोन हजार संपादक पत्रकारांना विस्तृत मार्गदर्शन केले.यावेळी राज्य संघटक प्रमोद तोडकर यांनी राज्य शासनाला सादर केले जाणारे ११ ठराव अधिवेशनात मांडले व याला राज्य कार्यकाकारणी व सदस्यांनी एकमताने मंजुरी देण्यात आली.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन केल्याने महा अधिवेशन यशस्वी झाले. यावेळी राज्य संघटक शामल खैरणार,,सहसचिव केतन महामुनी, कोषाध्यक्ष अमित इंगोले , सहकोषाध्यक्ष सूर्यकांत वायकर ,प.महाराष्ट्र उपाध्यक्ष टिंकू पाटील राज्य संघटक एकनाथ पाटील ,राज्य संघटक संजय जेवरीकर ,राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, सुनिल उंबरे, सुभाष चिंधे, प्रवीण नागणे,राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, प्रमोद मोरे , चंद्रकांत भुजबळ, ताराचंद म्हस्के, पद्माकर कुलकर्णी ,दीपक नलावडे, रितेश पाटील ,संतोष सूर्यवंशी, संजय कदम ,अमोल पाटील,प्रमोद मोरे,प्रवीण खंदारे,स़जय भैरे, प्रफुल्ल वाघुले यांनी विशेष परिश्रम घेतले परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील यांनी केले तर आभार कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह देसाई.

  तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह …