no images were found
२६ ते २९ जानेवारीला”पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे “भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २०२४ हे येत्या २६ ते २९ जानेवारी २०२४ या चार दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. येथील मेरी वेदर मैदान येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे खास आकर्षण राष्ट्रीय पुरस्कार विजेता *हरियाणा चॅम्पियन गोलू टू १० कोटीचा रेडा* आहे.
देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून विविध जातिवंत जनावरे, पशुपक्षी, तांदूळ,मध व मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन २६ जानेवारीस दुपारी ३ वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती असणार आहे.
याचबरोबर यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,विधानसभा सदस्य विनय कोरे, मा. आमदार प्रकाश आवाडे, मा.आमदार प्रकाश आबिटकर, मा. आमदार राजेश पाटील, मा.आमदार सुरेश हाळवणकर मा. आमदार अमल महाडिक,भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हाध्यक्ष भाजपा विजय जाधव, पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, कोल्हापूर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष व सौ.रुपाराणी निकम,व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले आदि उपस्थित असणार आहेत.
तर २९ रोजी होणाऱ्या सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभास मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत.यावेळी रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ना. श्री चंद्रकांत दादा पाटील, सहकार व संसदीय कार्यमंत्री श्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार ना.श्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री छत्रपती शाहू ग्रुप चेअरमन श्री राजे समरजीत सिंह घाटगे, महाराष्ट्र राज्य भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांची उपस्थिती असणार आहे.
प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले आहे.
या प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक स्टॉलचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे.चार दिवस याठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे.
या प्रदर्शनात २७ जानेवारीस पौष्टिक तृणधान्य पिके आहारातील महत्त्व व लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर योगेश बन नाचणी पैदास कार विभागीय संशोधन केंद्र कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत.तर भाजीपाला सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. भरत पाटील भाजीपाला पैदास कार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे मार्गदर्शन करणार आहेत. तर पीक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फायदेशीर या विषयावर प्रा.अरुण मराठे कृषी महाविद्यालय कोल्हापूर मार्गदर्शन करणार आहेत.
२८ जानेवारी रोजी उसाचे प्रसारित नवीन वाण व लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर दत्तात्रय थोरवे ऊस पिक संशोधक मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. लंपी आजार व वांधतव व निवारण या विषयावर डॉ. सँम लुद्रिक पशुधन विकास अधिकारी कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत. आणि ठिबक सिंचनाचा वापर काळाची गरज या विषयावर डॉ. अरुण देशमुख प्रमुख नेराफिम प्रा. लिमिटेड पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत.आणि २९ जानेवारी रोजी जैविक खतांचा पूरक वापर फायदेशीर या विषयावर डॉ. रवी कानडे प्रा. कृषी महाविद्यालय कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत.तर प्लॅस्टिक कल्चर नवयुगातील शेतकऱ्यांचे आधुनिक साधन या विषयावर व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले हे मार्गदर्शन करणार आहेत.ही सर्व व्याख्याने दुपारी १२ ते २ या वेळेत होणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये ऑरगॅनिक बायो फर्टीलायझर मध्ये युगांतर अँग्रो, वनिता अँग्रो,पॉवर टिलर आणि रोटावेटर मध्ये डेक्कन फार्म इक्विपमेंट, पंप मध्ये बी.के.सेल्स,फ्लोटेक पंप सहभागी झाले आहेत.ट्रॅक्टर मध्ये ब याचबरोबर कॅटल फीड मध्ये अमूल पशू आहार व्हीर बॅक अँनिमल हेल्थकेअर.
सोलरमध्ये रकोर्ल्ड (कौशिक सोल्यूशन्स)श्री सद्गुरू सोलर,आदी.मिल्कमध्ये चितळे डेअरी, वारणा दुष संघ,गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आदी तर फूड मध्ये अँपीज इंडिया लिमिटेड.सवई मसाले (पीकेएम फूड) वाटण कंपनी जीजाई मसाले, आवजारांमधे विजय कृषी अवजारे,श्री महालक्ष्मी शेती अवजारे विभाग, पॉप्युलर इम्प्लिमेंट इरिगेशनमध्ये पूर्वा केमटेक प्रा.ली,जलधारा ड्रीप इरिगेशन, नेटा फिम इरिगेशन,शेतकरी ड्रिप इरिगेशन याशिवाय बळीराजा आटा चक्की यांचे बळीराजा वॉटर फ्युरिफायर हे नवीन पेटंट मार्केट मधे येत आहेत. आदी कंपन्यांचा समावेश आहे.आणि त्यांची उत्पादने पाहावयास मिळणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये पाच महिलांना जिजामाता शेतीभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना शेती भूषण कृषी सहाय्यक, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव भीमा कृषी रत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धांचे बक्षीसे दिली जाणार आहेत.
आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी आदि नमुनांचे तांदूळ असणार आहेत. तसेच बाजरी नाचणी गूळ,हळद विक्रीसाठी असणार आहेत.पाणबोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन, पहावयास मिळणार आहे.
तसेच भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळणार आहेत. प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, जाफराबादी उस्मानाबादी शेळी, बोकड, कडकनाथ कोंबडी, सस्ते पांढरे उंदीर तसेच कुक्कुटपालन इमूपालन वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बैल घोडे, पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत. ज्यामधून उत्कृष्ट जनावरास पारितोषिक दिले जाणार आहेत. त्याचबरोबर पीक स्पर्धा, पुष्पस्पर्धा विविध जनावरांच्या स्पर्धा खाद्य महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व याठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. दुपारच्या सत्रात कृषी तज्ञांची व्याख्याने होणार आहेत.
प्रदर्शनाचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे मुख्य प्रायोजक आहेत.असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भीमा उद्योग समूहासह खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.यावेळी पत्रकार परिषदेला सत्याजित भोसले,प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा, अशोक सिधनेर्ले, आदी उपस्थित होते.