no images were found
कोल्हापूर वासियानी ताकत द्या :- भाई जगताप
कोल्हापूर ( प्रतिनिधी )
पर्ल हॉटेल शाहूपुरी येथे अखिल भारत मराठा महासंघ दिलीप भाई जगताप गट राष्ट्रीयअध्यक्ष राष्ट्रीय चिटणीस दशरथ पिसाळ राष्ट्रीय युवक अध्यक्ष रणजित जगताप यांच्यावतीने विविध पदाधिकाऱ्यांची पदाधिकारीनिवड व पदभार बैठक घेण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्षपदाची माळ जय शिव सम्राट मित्र मंडळाचे जुने कार्यकर्ते रमनमळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गणपती पाटील याना मिळाली तसेच महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सौ शारदा विजय शिंदे यांना पदभार देण्यात आला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप भाई जगताप यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की मराठा महासंघ म्हणून सर्व समाजातील प्रमुख अडचणी दूर करण्यात सर्वत्र सर्व समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे अखिल भारत मराठा महासंघ हा 1930 पासून सर्व समाजाच्या वतीने सर्व समाजाकरिता आंदोलन व सामाजिक प्रश्नासाठी झ्ट त आहे त्यामुळे भविष्यात म्हणून संघर्ष विर मनोज जरांगे पाटील यांच्यापाठोपात कोट्यावधी असलेला मराठा समाज यांचे जर म्हणणे ऐकून घेतले नाही आरक्षण दिले नाही तर तर दिल्लीमध्ये चक्काजाम करणार आहोत यावेळी दिल्लीमधील मराठा जात समाज याची ताकद सर्व जगाला माहित आहे 1960 जाट- मराठा आमच्या समाजाने यांनी दिल्ली येथे काँग्रेसच्या आठमुढ्या धोरणालाअशी दाखवून दिली की आंदोलनामध्ये मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांचे मुडदे हजारो पडले त्यावेळी त्या वेळेच्या सरकारला माहित आहे त्यामुळे सर्व समाजाने मराठा समाजास आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा अशी दीलीप भाई जगताप यांनी मागणी केली दरम्यान
अखिल भारत मराठा महासंघ महिला संघटक म्हणून माधुरी जाधव तसेच माधुरी लचके आणि मराठा महासंघ युवक अध्यक्ष सुनील मगदूम यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सुरेंद्र पिसाळ यांनी केले तसेच आभार प्रदर्शन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गणपती पाटील यांनी केले या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध मराठा संघटक आणि शेकडो कार्यकर्ते यांची उपस्थिती होती