no images were found
मा.जिल्हाधिकारी रेखावार व प्रजासत्ताचे दिलीप देसाई यांचे अभिनंदन
कोल्हापूर :-शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेली कोट्यावधी रुपयांची अमेरिकन मिशनची ५७ एकर जागा सरकार जमा झाल्याचे ऐकून समाधान झाले.
या जागेवर अनेक लँडमाफियांचा जागा हडप करण्याचा प्रयत्न होता ही सर्व माफिया मंडळी प्रशासनातील महानगरपालिका, भुमिअभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, सिटीसर्वे, इत्यादी कार्यालयांमधील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही अमेरिकन मिशनची जागा हडप करण्याचा प्रयत्न करत होते. वरील सर्व खात्यांमधील अनेक अधिकारी सर्व सामान्यांना कायमच वेगळा न्याय देतात,व अशा धनदांडग्या लँडमाफियांसमोर पैशासाठी लोटांगण घालतात हे वास्तव्य आहे.
आमची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की, या जागेवरील सर्व अतिक्रमणे ताबडतोब जमीनदोस्त करावीत व या कामात ज्या लँडमाफियांना ज्या अधिकाऱ्यांनी सरकारी जागा संगनमताने हडप करण्यासाठी सहकार्य केले त्यांची नावे जाहीर करावीत व चौकशी करून त्यांना पहिल्यांदा गजाआड करावे म्हणजे भविष्यात कोणी सरकारी जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. असे पत्रक शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिद्धीस दिले आहे.