
no images were found
समाजाबद्दलच्या भावनिकतेची धार बोथट झाल्यामुळे समाजावर अन्याय -प्रा.सुभाष वायदंडे
कोल्हापुर(प्रतिनिधी):-समाजाबद्दलच्या असंवेदनशिल भावनामुळे आणी राज्यकर्त्यांची मतदारां बद्दलची उदासिनता यामुळे सामाजिक चळवळींची धार बोथट बनल्यामुळे सामाजिक चळवळ पुढे नेण्याची आणी त्या बद्दल समाजात जाणीव निर्माण करण्याची जबाबदारी पुरोगामी संघर्ष परिषदेची असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा.सुभाष वायदंडे यांनी केले. ते संघटनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवन मध्ये आयोजित केलेल्या संघटनेच्या “जाणीव” मेळाव्या मध्ये बोलत होते.स्वागत व प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब चोपडे यांनी केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सुनिता खटावकर, राज्य महासचिव अर्चना घोरपडे, राज्य उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे, राजू घाटगे,कर्नाटक राज्य संघटक लखन वायदंडे,स्वप्निल बनसोडे,सुकेशिनी साठे, राम मोरे, प्रकाश फाळके यांची भाषणे झाली. सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास प्रा. सुभाष वायदंडे यांनी कार्यकर्त्यांसह अभिवादन केले.
सदर मेळाव्यास प्रमुख उपस्थितीत कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्षा सविता बनसोडे, राज्य उपाध्यक्षा शोभा माळी, पशु महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे,मेजर अंकुश शिंदे ,अश्विनी नवले, वैशाली चव्हाण, शंकर कांबळे,शंकर चव्हाण, विजय सावंत, शशिकांत गायकवाड, युवराज सोनवले, सुहास भाऊ कदम, संदीप माने, शिवाजी सकटे, शिला बनसोडे,वनिता सोनवले, अधिक चव्हाण ,शंकर चव्हाण,सागर लांडगे, वैभव पाटील ,हणमंत माने, विकास सरगडे, रेणुका बनसोडे, खुदबुद्दीन करीमखान,रेश्माबी करीमखान, बाबू कांबळे निशिकांत देवकुळे, राहुल वारे, इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सदर मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष दौलत घाटगे, पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष गणेश घाटगे, संभाजी चौगुले अर्जुन सोनुले,रवि हंकारे,दादासो कांबळे यानी केले.शेवटी आभार राज्य उपाध्यक्ष राजू घाटगे यांनी मानले.