no images were found
पेट्रोल अन् डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार !
नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात होती. देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करावे की नाही, यावर पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयामध्ये बराच काळ चर्चा सुरू होती. समजा, पेट्रोल अन् डिझेल स्वस्त केले तरी ते किती करावे? दोन्ही मंत्रालयांपैकी त्याचा भार कोण उचलणार, अशीही चर्चा सुरू होती. या संपूर्ण खर्चाचा बोजा तेल कंपन्यांवरच टाकावा का? यावरही विचारविनिमय सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, या संपूर्ण प्रकरणावर दोन्ही मंत्रालयांमध्ये एकमत झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याची तयारीही सुरू झाली आहे. ज्याची घोषणा खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
नवीन वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८ ते १० रुपयांची कपात करून मोठी घोषणा करू शकतात. देशातील महागाई कमी करणे हे सरकारचे प्राथमिक लक्ष्य बनले असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. महागाई कमी करण्यासाठी आरबीआयने आधीच व्याजदर २.५० टक्क्यांनी वाढवले आहेत. तसेच अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी सरकार आधीच अनेक पावले उचलत आहे. आता फक्त पेट्रोल आणि डिझेल उरले होते, जे सरकारसाठी डोकेदुखी ठरत होते. ज्यावर काही काळ अर्थ आणि तेल मंत्रालयात चर्चा सुरू होती. दोन्ही मंत्रालयांना डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत काय आहे, याचे निरीक्षण करायचे होते. जर कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलर किंवा त्याहून कमी राहिली तर जानेवारीच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.