no images were found
‘कैसे तुम मुझे मिल गये’मध्ये होणार उषा नाडकर्णी यांचा प्रवेश!
दोन पूर्णपणे भिन्न स्वभावांच्या व्यक्तींमधील प्रेमकथा असलेली ‘झी टीव्ही’वरील ‘कैसे तुम मुझे मिल गये’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत चालली आहे. यात सुयोग्य जीवनसाथी मिळाल्यावर यशस्वी वैवाहिक जीवनासाठी प्रयत्न करण्यावर विश्वास असलेल्या अमृता (सृती झा) नावाच्या एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय मुलीची कथा आहे. ती दिल्लीत राहणार््या आणि जगाचा अनुभव घेतलेल्या विराट (अर्जित तनेजा) या एका पंजाबी तरुणाच्या प्रेमात पडते. पण अर्जितचा विवाह संस्थेवर विश्वास उरलेला नसतो. बहुसंख्य मुली या केवळ पैशाच्या मागे असतात, अशी त्याची ठाम समजूत झालेली असते.
खुर्चीला खिळवून ठेवणार््या या कौटुंबिक मालिकेच्या गेल्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना नाट्यपूर्ण प्रसंग पाहायला मिळाल्याने त्यांची उत्कंठा वाढली आहे. अमृताची आई भवानी (हेमांगी कवी) हिचे दागिने घेण्यासाठी तिच्या वडिलांचे येणे, त्यानंतर आपल्या वडिलांचे नाव लावण्यास नकार देत आपल्या आईचे नाव लावण्याचा अमृताने घेतलेला निर्णय, यातून जे योग्य आहे, त्यामागे ती ठामपणे उभी राहताना दिसली होती. या सर्व घडामोडींमध्येच प्रेक्षकांना आता नामवंत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा या मालिकेत होणारा धमाकेदार प्रवेश पाहायला मिळेल. मालिकेत अमृताची आजी ज्ञानेश्वरी यांची व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत.
मालिकेच्या ताज्या प्रोमोमध्ये अमृताचे लग्नाचे वय टळून गेल्याबद्दल बबिता (किशोरी शहाणे-विज) अमृताच्या आईला टोमणे मारताना प्रेक्षकांना दिसेल. समाजात केवळ महिलांनाच प्रश्न विचारले जातात, याविरोधात अमृताला आवाज उठवते, तेव्हा तिच्या बाजूने बोलण्यासाठी तिची खमकी आजी उषा नाडकर्णी उभी राहताना दिसेल. चिटणीस कुटुंबातील या सर्वात ज्येष्ठ सदस्याच्या प्रवेशानंतर तिचे विचार अमृताच्या विचारांशी किती जुळतात, ते पाहून प्रेक्षक चकित होतील. त्यावरून तरूण पिढीचे विचार हे सामान्यत: आपल्या आजी-आजोबांच्या विचारांशी जुळत असतात, हे सत्य पुन्हा एकदा दिसून येईल. लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या चाहत्यांना त्यांना पुन्हा एका नव्या टोकदार संवाद म्हणणार््या आणि खाष्ट व्यक्तिरेखेत पाहण्याचा आनंद मिळेल.
उषा नाडकर्णी म्हणाल्या, “प्रदीर्घ काळानंतर झी टीव्ही वाहिनीवर पुन्हा एकदा भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. हे म्हणजे स्वगृही परतण्यासारखं आहे. ‘कैसे मुझे तुम मिल गये’ मालिकेत मी अमृताच्या आजीची भूमिका साकारणार आहे. जे योग्य आहे, त्याच्या बाजूने मी उभी राहते आणि त्यासाठी वेळप्रसंगी भांडणही करते. माझी ज्ञानेश्वरीची व्यक्तिरेखा ही एका कणखर महिलेची असून ती प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवील, याची मला खात्री आहे.”