no images were found
महापालिकेच्यावतीने शहरामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य घनकचरा विभागामार्फत आज दि.03 जानेवारी 2023 रोजी स्वच्छता मोहीम द्वारे शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये महावीर कॉलेज ते भगवा चौक, भगवा चौक ते शुगरमिल रोड, खानवीलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय, धैर्य प्रसाद मंगल कार्यालय ते लाईन बाजार, पितळी गणपती ते डी.एस.पी. चौक, दसरा चौक, भक्ती पुजा नगर ते यल्लमा मंदिर, शेंडा पार्क ते मोती नगर रोड या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता सकाळच्या सत्रात सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत करण्यात येतात. त्याच बरोबर यापुढे दररोज रोटेशन पद्धतीने सकाळी 10 नंतर वार्डमधील सर्व सफाई कर्मचारी एकत्रित करून मोहिम पध्दतीने सार्वजनिक शौचालयाची सफाई करण्यात येणार आहे.
शहरातील दैनंदिनपने निर्माण होणारा घराघरातील कचरा संकलन करणेकरीता ॲटो टिपर वाहनांची सोय करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी आपल्या घरातील दैनंदिनपणे निर्माण होणारा ओला व सुका कचरा वर्गीकृत करुन कोल्हापूर महानगरपालिकेच्या ॲटो टिपर वाहनाकडेच द्यावा. रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकु नये जेणेकरुन आपला परिसर स्वच्छ व निरोगी राहील याकरीता महापालिकेच्या ॲटो टिपर वाहनांकडे कचरा देऊन कोल्हापूर महागरपालिकेस सहकार्य करावे. तसेच आपलेकडे ॲटो टिपर वाहन कचरा संकलनासाठी न आलेस आपल्या जवळच्या आरोग्य विभागातील संबंधीत मुकादम व आरोग्य निरिक्षक यांच्यासी संपर्क साधावा आपली तक्रार त्यांच्याकडे करावी. त्यानंतर ही आपल्या तक्रारीची पुर्तता न झालेस मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार मो.क्र.9766532044 या क्रमांकावर संपर्क करण्यात यावा. असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे.