no images were found
श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते नाविन्यपूर्ण श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेचे प्रकाशन
कोल्हापूर,( प्रतिनीधी ) : जवळपास ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराची निर्मिती होत आहे. प्रत्येक श्रीराम भक्तासाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. हा सोहळा प्रत्येक घरामध्ये साजरा व्हावा यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून “हर घर बनेगा श्री राम मंदिर” या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आले आहे. यामध्ये श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेचे कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीने दि.२२ जानेवारी, २०२४ पासून कोल्हापूर शहरातील घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते कणेरीमठ येथे पार पडला.
यावेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी या अभिनव उपक्रमास शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले. यासह या उपक्रमाची व्याप्ती वाढून संपूर्ण देशभर या पुस्तिका वितरीत व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली.
श्री राम मंदिर उद्घाटन सोहळा प्रत्येक घरामध्ये साजरा व्हावा यासाठी श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेची श्री.राजेश क्षीरसागर यांच्या कुशल नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तिकेमध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनविण्याचे तंत्र व साहित्य देण्यात आले आहे. पुस्तिकेमध्ये दिलेले मंदिराचे भाग एकत्र जोडून कुटूंबातील सर्व जण एकत्र मिळून मंदिराची प्रतिकृती बनवू शकतात. पुस्तिकेमध्ये दिलेले क्यू आर कोड स्कॅन करुन मंदिर बनविण्याचे तंत्र व्हिडिओद्वारे पाहता येते. याचबरोबर पुस्तिकेमध्ये अयोध्या श्रीराम मंदिराचा इतिहास, संपूर्ण रामायण चित्रमय रुपात, रामरक्षा, प्रभू श्रीरामांची १०८ नावे, तसेच लहान मुलांना रंगविण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा व इतर काही कलात्मक ॲक्टिव्हिटीज यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा पध्दतीची ही संकल्पना महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात प्रथमच कोल्हापूरमधून साकारली जात आहे. कुटूंबातील सर्व सदस्यांनी एकत्र मिळून श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनवावी व आपापल्या घरी स्थापित करावी यासाठी सदर पुस्तिका राज्यातील प्रत्येक घरात पोहचविण्याचा श्री.राजेश क्षीरसागर यांचा प्रयत्न राहणार आहे. याचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापूर शहरात या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे जेणेकरुन अयोध्येमध्ये होणारा श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा फक्त अयोध्येमध्येच नाही तर प्रतिकात्मक पध्दतीने प्रत्येक घरामध्ये साजरा होईल.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, हिंदुत्ववादी संघटनांचे शिवानंद स्वामी, गजानन तोडकर, दीपक देसाई, पराग फडणीस, शिवसेनेचे मा.नगरसेवक राजू हुंबे, कमलाकर किलकिले, दीपक चव्हाण, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, रणजीत मंडलिक, अक्षय कुंभार, साईप्रसाद बेकनाळकर, शारदा धामणे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.