no images were found
युवा स्टेशनरीने सांगलीत ‘वसुधैव कुटुंबकम’ कला कार्यशाळेद्वारे नवीन वर्षाचे स्वागत केले
सांगली : नवनीत एज्युकेशनच्या युवा स्टेशनरीतर्फे सांगलीमध्ये १९ ते २१ डिसेंबर दरम्यान कला कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. ‘विल इंडिया चेंज फाउंडेशन’ या एनजीओच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘वसुधैव कुटुंबकम’ अशी या कार्यशाळेची मध्यवर्ती संकल्पना होती. ‘एक जग एक कुटुंब’ ही संकल्पना या कार्यशाळेतून लहान मुलांच्या मनात रुजविण्यात आली.
माधुरी सुदा यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादमध्ये ९ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळांमध्ये सुमारे 2,300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नव कृष्णा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, गुरुवर्य टीडी लाड हायस्कूल, राणी सरस्वती देवी कन्याशाळा, सिटी हायस्कूल, अल्फोन्सो स्कूल, झील इंटरनॅशनल स्कूल आणि सांगली हायस्कूल या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाने युवा ने या कार्यशाळांचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व मदत करण्यासाठी वरद वैभव चंदगडकर हा ‘वंडरकिड’ या कार्यशाळेत सहभागी झाला होता. वरद हा एक निष्णात सायकलस्वार आणि कलाप्रेमी आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याच्या सायकलिंग कामगिरीबद्दल त्याला मान्यता मिळाली आहे मुलांमधील कलात्मक कौशल्याचे पोषण करणे तसेच एकता, विविधता आणि जग हे एक मोठे कुटुंब आहे ही संकल्पना रुजविणे हे या कार्यशाळांचे उद्दिष्ट होते. या कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आणि त्यातून अपेक्षित परिणाम साध्य करण्यात ‘विल इंडिया चेंज फाउंडेशन’ने महत्त्वाची भूमिका निभावली. सर्वांगीण शिक्षण व सामुदायिक हिताचा युवा स्टेशनरीचा निर्धार या मूल्याशी या कार्यशाळा सुसंगत होत्या.
युवा चे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यामधील कलाकाराला वाव देणे हा युवा चा हेतू आहे. ते म्हणतात, “या कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्या संकल्पना आणि चित्रकला व हस्तकलेची तंत्रे शिकण्याची संधी मिळते.” युवा चे सीनियर ब्रँड मॅनेजर अमर कुलकर्णी म्हणाले, “लहानग्यांची कल्पकता व उत्साह पाहणे हे खरच सद्गदित करणारे होते. मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या कल्पनेचा वारू चौफेर दौडू शकतो. या कार्यशाळांमधून कलात्मक गुणांचे दर्शन झालेच, त्याचप्रमाणे मुलांमध्ये एकत्रितपणाच्या भावनेलाही चालना मिळाली. ज्याप्रमाणे उत्तम दर्जाची स्टेशनरी पुरविण्याचा युवा चा निर्धार असतो, त्याचप्रमाणे लहान मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी आणि मानवतेतील ऐक्याचा सोहळा साजरा करण्यासाठी कॅनव्हास उपलब्ध करून देणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते.
युवा स्टेशनरी आणि ‘विल इंडिया चेंज फाउंडेशन’ यांच्यातील हा सहयोगात्मक प्रयत्न आणि हे मान्यवर मार्गदर्शक व वंडरकिड्स यांनी कल्पकता, शिक्षण व सामुदायिक संवाद घाडविण्याच्या निर्धाराला बळकटी देतो. युवा स्टेशनरी प्रेरणा देणाऱ्या दीपस्तंभाची भूमिका बजावतात. आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून कल्पकता, शिक्षण आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देत उपक्रम लहान मुलांच्या हृदयावर आणि मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवतात.