Home स्पोर्ट्स रिवहन कल्चर व स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.                                         

रिवहन कल्चर व स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.                                         

14 second read
0
0
44

no images were found

परिवहन कल्चर व स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.                                           कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :परिवहन कल्चर व स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने उद्यापासून छत्रपती शाहू महाराज चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शास्त्रीनगर येथील मैदानावर होणार आहेत. उद्या गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता सुमित चव्हाण क्रिकेट अकॅडमी सांगली आणि परिवहन स्पोर्ट्स या संघामध्ये उद्घाटनाचा सामना होणार आहे .या स्पर्धेत कोल्हापुरातील पाच ,सांगली येथील दोन तर सिंधुदुर्ग येथील एक संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे .हे सर्व सामने ९० षटकाचे असतील या स्पर्धेत एकूण 15 सामने होणार असून ही स्पर्धा शास्त्रीनगर मैदान छत्रपती शिवाजी विद्यापीठ मैदान कागल येथील मैदानावर महिनाभर सुरू राहणार आहेत .या स्पर्धेत रणजी क्रिकेटपटू विश्रांत मोरे रणजीत निकम सहभागी होणार आहेत .अशी माहिती मधु बामणे यांनी पत्रकार परिषदेत दिली .ते म्हणाले की ,एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी एकत्र देऊन परिवार ची स्थापना केली आहे. या फाउंडेशन मार्फत विविध कला क्रीडा अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या क्रिकेट स्पर्धा या मर्यादित षटकांच्या कमी वेळेत खेळण्याकडे लक्ष केंद्रित केले गेल्याने खेळाडूंना पुरेसा खेळ करणे शक्य होत नाही. याचा विचार करून फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केले आहेत. त्याचे औचित्य साधून या स्पर्धेचे छत्रपती शाहू महाराज चषक या नावाने ही स्पर्धा उद्यापासून कोल्हापुरातील शास्त्रीनगर येथील मैदानावर सुरू होणार आहेत .या पत्रकार परिषदेला किशोर कटके ,विक्रम जाधव ,प्रकाश माजगावकर ,चारुदत्त सूर्यवंशी, अनिल शिंदे ,राजू धूपत, हेमंत पोळादी, उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…