no images were found
जगातील बेस्ट युट्युबर पंतप्रधान मोदी!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर तब्बल 20 दशलक्ष सबस्क्राइबर्स मिळवणारे पहिले जागतिक नेते ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनेलवरच नव्हे तर सर्वच सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यापूर्वीही मोदींनी सोशल मीडियावर आपली दमदार छाप पाडली होती. आणि आता या नव्या विक्रमासह मोदी भारतातली अन्य राजकीय नेत्यांच्याच नव्हे तर जगभरातील सर्व राजकारण्यांच्या पुढे पोहोचले आहेत. केवळ सबस्क्राइबर्स नाहीत तर व्हिडिओला मिळणार्या एकूण व्ह्यूजची संख्या सुद्धा सर्व नेत्यांहून अधिक आहे. प्राप्त माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्या चॅनेलवर आजपर्यंत 4.5 अब्ज (450 कोटी) व्ह्यूज मिळाले आहेत. यातील बहुसंख्य व्ह्यूज हे केवळ भारतातीलच नसून जगभरातील प्रेक्षकांचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनेलवर अंदाजे 23,000 व्हिडिओ असून यूट्यूबच्या पलीकडेही, त्यांचा प्रभाव इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या इतर प्लॅटफॉर्मवर विस्तारला आहे.
यापूर्वी 2022 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनेलने एक कोटी सदस्यांचा टप्पा ओलांडला होता, आणि आता 2023 च्या सरतेशेवटी मोदींच्या चॅनेलवरील सबस्क्राइबर्समध्ये आणखी 1 कोटींची भर पडली आहे. यूट्यूबवर, पंतप्रधानांनी विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये शासन, धोरणे आणि भाषणे यांचा समावेश आहे. मोदी सरकारच्या योजनांविषयी सुद्धा यातून माहिती दिली जाते तसेच काही योजनांचे यश सुद्धा यामाध्यमातून शेअर केले जाते. यूट्यूब व्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकांशी सक्रियपणे जोडलेले आहेत.
दरम्यान, मोदींच्या पाठोपाठ दुसर्या क्रमांकावर ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सनोरा आहेत, ज्यांच्या सबस्क्राइबर्सची संख्या 6. 4 दशलक्ष इतकी आहे, खरं पाहायला गेलं तर ही संख्या मोदींच्या तुलनेत केवळ एक अंश आहे. तर जागतिक नेत्यांमध्ये तिसरे सर्वाधिक सबस्क्राइब केलेले चॅनल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष (1. 1 दशलक्ष) आहे तर या यादीत चौथ्या स्थानावर, युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जो बायडन असून यांच्या र्धेीर्ढीलश चॅनेलवर केवळ 7 लाख 94 हजार सदस्य आहेत.