
no images were found
आमदार रोहित पवार यांची अजित पवार आणि भाजपकडून कोंडी ?
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे या दोघांचे स्थानिक राजकारण आणि श्रेयवादातून कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रस्तावित एमआयडीसीचा प्रश्न अधांतरी लटकला आहे. आमदार पवार यांनी प्रस्तावित केलेल्या एमआयडीसीच्या जागेचा प्रस्ताव आमदार राम शिंदे यांच्या पुढाकारातून बोलावलेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रद्द केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीचा प्रश्न आमदार राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने मार्गी लागेल, असे सांगून राज्य सरकारचा रोख स्पष्ट केला आहे.