no images were found
नगररचना विभागाकडील तक्रारी नगरचना कार्यालयात स्विकारणार
कोल्हापूर :- नगररचना विभागाकडील बांधकामाबाबत तक्रारीचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी बुधवार दि.20 डिसेंबर 2023 रोजी नगररचना कार्यालयात नागरीकांच्या तक्रारी स्विकारणार आहेत. त्यामुळे नगररचना विभागाकडील नागरीकांच्या तक्रारी दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत जनता बझार येथील नगररचना कार्यालयात नागरीकांनी आपल्या तक्रारी घेऊन उपस्थित रहावे. यावेळी सहा.संचालक नगररचनाकार, उप-शहर रचनाकार व सर्व कनिष्ठ अभियंता या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. तरी शहरातील नागरीकांनी नगररचना विभागाशी निगडीत असलेल्या आपल्या तक्रारी महापालिकेने निश्चित करुन दिलेल्या ठिकाणी मांडाव्यात असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.