no images were found
‘एजॅक्स इंजिनिअरींग’तर्फे ‘थ्री-डी काँक्रीट प्रिंटिंग’ तंत्रज्ञानाचे अनावरण;भारतातील व जगातील बांधकामांसाठी नाविन्यपूर्ण उपाय
एजॅक्स इंजिनीअरींग या भारतातील काँक्रीट उपकरणांच्या उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ‘थ्री-डी काँक्रीट प्रिंटिंग’ तंत्रज्ञानामध्ये प्रवेश केला असून स्वतःचे ‘थ्री-डी काँक्रीट प्रिंटिंग मशीन’ सादर केले आहे. कंपनीने आज या संदर्भात घोषणा केली. कंपनीने ३ दिवसांत ३५० चौरस मीटरचे घर बांधून या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले. पारंपारिक बांधकाम पद्धतीनुसार या स्वरुपाचे घर बांधण्यासाठी साधारणपणे काही महिन्यांचा अवधी लागत असतो. त्या तुलनेत ‘एजॅक्स थ्री-डी कॉंक्रिट प्रिंटिंग’ तंत्रज्ञानाच्या माधमातून हे बांधकाम वेगाने व मोठ्या प्रमाणावर करता येते. तसेच ते किफायतशीर आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ ठरते. मोठ्या संख्येने घरे असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये बांधकाम साधारणतः एकसारखे असते आणि तेथे जलद गतीने काम होणे अपेक्षित असते. अशा स्वरुपाच्या प्रकल्पांमध्ये ‘एजॅक्स थ्री-डी कॉंक्रीट प्रिंटर’ची उपयुक्तता जास्त असणार आहे. आज अनावरण करण्यात आलेले घर हे परवडणाऱ्या घरांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने एक मापदंड निर्माण करणारे आहे. अर्थात ‘एजॅक्स थ्री-डी कन्स्ट्रक्शन प्रिंटर’चा उपयोग हा केवळ घरे बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर त्याची क्षमता मोठे बंगले, टपाल कार्यालये, अग्निशमन केंद्रे, पवनचक्क्यांचे चौथरे यांची उभारणी करण्याचीदेखील आहे. अगदी पुतळ्यांची उभारणीही या तंत्रज्ञानाने करता येते. खरे तर या तंत्रज्ञानामुळे बांधकामातील विविध पर्याय अमर्यादित प्रमाणात साकारता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान गुणवत्तेच्या दृष्टीने जागतिक स्तराशी सुसंगत आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या आधारे थ्री-डी मुद्रित संरचना मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतील, असे भाकीत आज आपल्याला करता येते.
‘एजॅक्स थ्री-डीसी प्रिंटर’ हा ‘कॅड’ मॉडेलमधून भौतिक स्वरुपातील वस्तू तयार करण्यासाठीचे ‘कॅड डिझाइन’चे रुपांतरण अखंडपणे करू शकतो. बांधकाम तंत्रज्ञानातील एक गेम-चेंजर ठरणाऱ्या ‘एजॅक्स थ्री-डीसी’ मुद्रण तंत्रज्ञानातून डिझाइनची लवचिकता आपल्याला मिळते. तसेच जटिल भूमितीय डिझाईन्स असलेले कॉंक्रीटचे घटक मुद्रित करता येतात आणि यातून सामग्रीचा अपव्यय कमी करता येतो. त्याचप्रमाणे सर्व घटकांमध्ये थेट कार्यात्मक वैशिष्ट्ये समाविष्ट करून, वाढीव ताकद आणि टिकाऊपणा असलेली एखादी संरचना तयार करता येते. ‘एजॅक्स थ्री-डी काँक्रीट प्रिंटर – एपीएक्स १.०’ या प्रिंटरमधून १० मीटर लांबी, १० मीटर रुंदी व ९ मीटर उंची एवढ्या आकाराची मोठी इमारत बांधता येते. भविष्यात यापेक्षाही अधिक क्षमता असलेली मॉडेल्स काढण्याचा कंपनीचा मनोदय आहे. मोठ्या आकाराचे प्रीकास्ट भाग असणाऱ्या प्रत्यक्ष साइटवरदेखील हा प्रिंटर वापरला जाऊ शकतो.
या अनावरणप्रसंगी बोलताना ‘एजॅक्स इंजिनीअरींग’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शुभब्रत साहा म्हणाले, “एजॅक्स इंजिनीअरींगमध्ये स्वावलंबन आणि नावीन्य या आमच्या व्यवसायासाठीच्या मूलभूत गोष्टी आहेत, असे आम्ही मानतो. एजॅक्स गेल्या ३ दशकांहून अधिक काळ भारतात ‘जागतिक दर्जाचे बांधकाम’ करीत आहे. आम्ही आमच्या ३६० अंशांत्मक कॉंक्रिट सोल्यूशन्सच्या विशिष्ट श्रेणींद्वारे भारतीय नवकल्पना आणि अभियांत्रिकी या संकल्पनेला चालना देत आहोत. थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा प्रारंभ करून, आम्ही नाविन्यता, शाश्वतता यांच्या माध्यमातून, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व उपकरणे भारतात तयार करण्यासाठीची आमची कटिबद्धता व्यक्त करीत आहोत. ‘थ्री-डी काँक्रीट प्रिंटर’मुळे बांधकामांमध्ये निर्माण होऊ शकणारे पर्याय लक्षात घेऊन आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. परिवर्तनशील भविष्याला आकार देण्यासाठी जलद गतीने मोठे प्रमाण गाठण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. त्यासाठी सक्षम होण्याचे आमचे हे प्रयत्न आहेत.”
बांधकामातील त्रुटी कमी करणे, विविध प्रकल्पांसाठी वेगवेगळी डिझाइन्स बनवून पाहणे, सामग्रीचा कमीत कमी वापर व कमी अपव्यय असे काही मोठे फायदे या तंत्रज्ञानामुळे साधता येतात. ‘एजॅक्स थ्री-डी कंक्रीट प्रिंटर’ अहोरात्र काम करू शकतो. त्यामुळे सुरक्षितता किंवा दृश्यमानतेच्या चिंतेमुळे रात्री काम न करण्याची शक्यता नाहिशी होते. साहजिकच बांधकाम वेगाने होते.
‘एजॅक्स इंजिनीअरींग’ने आपल्या वार्षिक उत्पन्नातही गेल्या वर्षभरात मोठी वाढ साध्य केली आहे. या उद्योगातील इतर कंपन्यांच्या तुलनेत ही वाढ जास्त आहे. याच प्रगतीच्या अनुषंगाने कंपनीने कर्नाटकमध्ये १०० कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. होसाहल्लीमध्ये एका नवीन प्रकल्पाची उभारणी आणि गवरीबिदनूरमधील उत्पादन क्षमतेचा विस्तार यांचा या गुंतवणुकीत समावेश असणार आहे.
‘एजॅक्स इंजिनीअरींग’ने “एजॅक्स स्कूल ऑफ काँक्रीट” ही एक संस्था उभारण्याचे ठरवले आहे. केवळ कौशल्य निर्मितीच्या संदर्भातच नव्हे तर कॉंक्रीटच्या उद्योगासंदर्भात संशोधन व विकास, सहकार्य व सहयोग आणि सल्लासेवा या बाबतीतही ही संस्था एक गेम-चेंजर ठरणार आहे. ‘एजॅक्स थ्री-डीसीपी’ तंत्रज्ञान सादर करून ‘एजॅक्स इंजिनीअरींग’ने भविष्यातील बांधकाम क्षेत्रात अव्वल स्थान पटकावण्याच्या दृष्टीने मुसंडी मारली आहे. यातून जागतिक उत्पादनाच्या आघाडीवर भारताच्या प्रवासाचे एक नवीन युग सुरू होईल.