no images were found
सरकारनं जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांवरून बच्चू कडू आक्रमक
मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्यासाठी नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली होती. ही मुदत संपवण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. जरांगे-पाटलांनी १७ डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही सरकारला इशारा दिला आहे.
“सरकारनं जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांनी पूर्तता केली नाही, तर आम्हाला आंदोलनात सहभागी व्हावं लागेल,” असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.