Home Uncategorized अदानींच्या साम्राज्यात प्रसिद्ध न्यूज एजन्सी दाखल

अदानींच्या साम्राज्यात प्रसिद्ध न्यूज एजन्सी दाखल

15 second read
0
0
20

no images were found

अदानींच्या साम्राज्यात प्रसिद्ध न्यूज एजन्सी दाखल

अदानी ग्रुपनं आपल्या पंखाखाली एका प्रसिद्ध न्यूज एजन्सीला घेतलं आहे. यावेळी कंपनीनं IANS या वृत्तसंस्थेतील बहुतांश भागभांडवल विकत घेतलं आहे.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी IANS इंडिया (IANS India) ही वृत्तसंस्था विकत घेतली आहे. देशातील या मोठ्या डीलनंतर मीडियावर अदानी ग्रुपची पकड मजबूत झाल्याचं बोललं जात आहे. याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये अदानींनी क्विंटिलियन बिझनेस मीडिया खरेदी केलं होतं, जे बीक्यू प्राईम (BQ Prime) नावाचा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म चालवतात. यानंतर डिसेंबरमध्ये अदानी समूहाने NDTV मधील 65 टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती.
अदानी समुहानं IANS या वृत्तसंस्थेतील बहुतांश भागभांडवल विकत घेतलं आहे. कंपनीनं नियामक माहितीमध्ये म्हटलं आहे की, तिच्या सब्सिडरी एएमजी मीडिया नेटवर्क्स नं आयएएनएस India Private Limited मध्ये 50 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. मात्र, अदानी समूहानं या कराराची किंमत जाहीर केलेली नाही.
गेल्या वर्षी मार्चमध्ये, अदानी समूहानं क्विंटिलॉन बिझनेस मीडिया, फायनान्स न्यूज डिजिटल प्लॅटफॉर्म बीक्यू प्राइम चालवणारी कंपनी खरेदी केली होती. यानंतर डिसेंबरमध्ये अदानींनी एनडीटीव्हीलाही आपल्या कचाट्यात आणलं होतं. या दोन्ही कंपन्या AMNL नं विकत घेतल्या होत्या. माहिती देताना, AMNL नं सांगितलं की, त्यांनी IANS आणि संदीप बामझाई सोबत शेअरहोल्डर करार केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात IANS चा महसूल 11.86 कोटी रुपये होता.
फायलिंगमध्ये असं म्हटलं आहे की, IANS चं संपूर्ण नियंत्रण AMNL कडे राहील. IANS मध्ये सर्व डायरेक्टर्सची नियुक्ती करण्याचा अधिकार कंपनीला असेल. आता IANS एजन्सी AMNL ची सब्सिडरी असेल.
गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडर म्हणून व्यवसाय सुरू केला. यानंतर हळूहळू त्यांनी पायाभूत सुविधा, बंदर, विमानतळ, FMCG, कोळसा, ऊर्जा व्यवस्थापन, सिमेंट आणि तांबे क्षेत्रात आपली पकड मजबूत केली. अलीकडेच अदानी समूहानं 5G टेलिकॉम स्पेक्ट्रम देखील खरेदी केलं होतं. अशातच आता मीडिया क्षेत्रातही अदाणींनी आपला दबदबा वाढवल्याचं पाहायला मिळत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…