
no images were found
शासनकर्ती जमात बना, हीच शूरवीरांना खरी श्रद्धांजली-डॉ.हुलगेश चलवादी
पुणे :-अस्पृश्यतेविरोधातील एल्गार आणि अस्मितेचा हुंकार असे भीमा-कोरेगावच्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. शूरवीर ‘महारां’नी’ आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या फौजेचा पराभव करीत इतिहास लिहला. ‘महार रेजिमेंट’ने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवत १ जानेवारी १८१८ रोजी अवघ्या १६ तासांमध्ये भीमा-कोरेगावच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. पंरतु,आज शासनकर्ती समाज बनण्यासाठीच्या प्रक्रियेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाचा लढवय्या बाणा बोथट झाला आहे. राज्यात बहुजनांचे शासन नाही. आता शासनकर्ती जमात बनने हीच भीमा कोरेगाव लढाईतील शहीद शूरविरांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया बसपाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.१) भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर व्यक्त केली. यावेळी बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.सुनिल डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
भीमा-कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीद वीरांना मानवंदना देत बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन बहुजन समाजाच्या एकसंधतेचा निर्धार व्यक्त केला. यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे, किरण जी, महेश जगताप, अशोक गायकवाड, सिद्धार्थ कांबळे, सुशील गवळी, अनिल त्रिपाठी, संदीप कांबळे, प्रवीण वाकोडे, नागसेन माला, बाळासाहेब आव्हारे, संतोष सोनावणे यांचा सह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते