no images were found
संगीत आणि नाटयशास्त्र विभागात ‘स्वररंग’ पुष्प दुसरे संपन्न
विद्यार्थांमधील विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाटयशास्त्र अधिविभागातर्फे विभागातील विद्यार्थी व पालकांसाठी ‘स्वररंग – पुष्प दुसरे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती प्रतिमा पुजनाने झाली. रंगतदार झालेल्या कार्यक्रामामध्ये सुरवातीला विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्य तसेच तबल्याच्या विद्यार्थांनी युगल तबला वादन सादर केले. त्यानंतर जेष्ठ संगीतकार पं. श्रीनिवास खळे व प्रसिद्ध गायक अरूण दाते यांची अनेक सदाबहार गाणी संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. नाटयशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘एक मुलाखत’ या उपहासात्मक प्रहसनाला प्रेक्षकांनी उस्फूर्त हास्य प्रतिसाद दिला. या संपूर्ण कार्यक्रमाला विभागातील शिक्षक सौ. गौरी कुलकर्णी यांनी हार्मोनिअमची साथ केली तर तबल्याची साथसंगत श्री. संदेश गावंदे
व विक्रम परिट या शिक्षक साथीदारांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन नाटयशास्त्र विभागाची विद्यार्थीनी कु. आसावरी कुलकर्णी हिने केले तर ध्वनिव्यवस्था श्री. मल्हार जोशी यांनी सांभाळली. या कार्यक्रमास विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनोद ठाकूरदेसाई, सौ. पदमश्री बागडेकर, सौ. प्रज्ञा रास्ते, सौरभ सनदी, भाग्यश्रीकालेकर, डॉ. सौ. शिवानी ढेरे, डॉ. संजय तोडकर उपस्थित होते.