
no images were found
कर्नाटकात काँग्रेसचा सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु
मुंबई : आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. निकालाचा पहिला कल हाती आला आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेससाठी बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी तयारी सुरू आहे. गुरुवार आणि शुक्रवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर शिवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस आपल्या उमेदवारांना रिसॉर्टमध्ये पाठवण्याचा विचार करत आहे का, असे विचारले असता शिवकुमार म्हणाले की, आम्ही फक्त आमचे काम करत आहोत. परिणामांची प्रतीक्षा करा.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी आज बंगळुरूमध्ये विधानसभा सदस्यांची बैठक बोलावली असून, सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी 10 चार्टर्ड फ्लाइट्स बुक केल्या आहेत. तसेच काँग्रेसने आमदारांसाठी हिल्टन हॉटेलमध्ये 50 खोल्या बुक केल्या आहेत. काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे ऑपरेशन लोटस कोणत्याही प्रकारे यशस्वी होऊ देऊ इच्छित नाही. भाजपचे ऑपरेशन लोटस हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपला कोणत्याही प्रकारे संधी मिळू नये, यासाठी काँग्रेसकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक मिनिटाचा अहवाल घेतला जात आहे. प्रत्येक जागेचा मागोवा घेतला जात आहे. सर्व आमदारांना कनेक्टिंग पॉईंट्सवर पोहोचल्यानंतर बंगळुरूला येण्यास सांगितले आहे.