no images were found
गुंतागुंतीच्या आपत्कालीन शस्त्रक्रियेने घडवला चमत्कार
वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर: आरोग्य सेवा क्षेत्रातील आघाडीवर असलेले वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर पुन्हा एकदा अनोखे प्रकरण हाताळले आहे. गुंतागुंतीची आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया हा एक चमत्कार होता आणि हा वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या समर्पित टीमचा त्यांच्या सामान्य लोकांची सेवा करण्याच्या ध्येयाचा पुरावा आहे. एका दुर्गम खेडेगावातील 63 वर्षीय पुरुष रुग्णाला डायलिसिसवर शेवटच्या टप्प्यात असलेल्या मूत्रपिंडाचा रोग (ईएसआरडी) आणि उच्च ताप आणि गळ्यात उजव्या बाजूने एचडी कॅथेटरसह वोक्हार्ट हॉस्पिटल्स मध्ये आणण्यात आले. पुढील तपासणीसाठी त्यांना डॉ.अक्षय सिंग यांच्याकडे पाठवण्यात आले. तापाचे कारण शोधण्यासाठी इको करण्यात आले. नंतर 2D इको मध्ये असे आढळून आले की रुग्णाला एओर्टिक वाल्ववरवेजिटेशन (संसर्ग) आहे आणि डाव्या बाजूच्या दुसऱ्या वाल्वमध्ये लिकेज आहे (तीव्र मीट्रल रीगर्गिटेशन) ही स्थिती होती . संसर्गाचे कारण एचडी कॅथेटर होते जे गेल्या 12 महिन्यांपासून बदलले नव्हते आणि गेल्या 6 महिन्यांपासून रुग्णाला खूप ताप येत होता. त्यांचे बीपी स्थिर नव्हते, त्यांना खूप ताप होता आणि ते डायलिसिसवर होते. याव्यतिरिक्त, त्यांचा रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी त्यांना उच्च सपोर्टच्या आयव्ही औषधांवर ठेवण्यात आले होते. ते सेप्टिक शॉकमध्ये होते. एक जीवघेणा स्थिती जी तेंव्हा उद्भवते जेंव्हा कुठल्या संसर्गानंतर तुमचा रक्तदाब धोकादायकरीत्या कमी पातळीपर्यंत घसरतो आणि बीपी राखण्यासाठी आयव्ही औषधांची आवश्यकता असते .
परंतु त्यात भर म्हणून रुग्णासोबत एक दुर्दैवी घटना देखील घडली, त्यांच्या एका व्हॉल्व वरील 5 सेमी संसर्गजन्य वस्तुमानांपैकी, वस्तुमानाचा एक भाग रक्ताद्वारे त्यांच्या डाव्या पायातील पोप्लिटियल आर्टरी मध्ये गेला. त्यांच्या डाव्या पायात तीव्र वेदना होत होत्या आणि त्यांच्या पायाचा रंगही बदलला होता. त्या आपत्कालीन स्थितीत त्यांचा डावा पाय कापण्यापासून वाचवण्यासाठी एम्बोलेक्टोमी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत क्लिष्ट डीव्हीआर (डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट) करण्यात आले. हे यशस्वीरित्या केले गेले आणि नंतर रुग्णाला मध्यम इनोट्रॉपिक सपोर्टसह स्थिर स्थितीत आयसीयूमध्ये हलविण्यात आले. टीमच्या अथक प्रयत्नांसह 13 दिवस आयसीयू मध्ये राहिल्यानंतर ,रुग्ण बरा झाला आणि सीकेडी (क्रोनिक किडनी डिसीज) लक्षात घेऊन वारंवार डायलिसिस करण्याचा सल्ला देऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.संपूर्ण टीमने असामान्य कामगिरी केली. डॉ. अक्षय सिंग (सीव्हीटीएस सर्जन) तज्ञ आणि समर्पित व्यावसायिक, क्रिटिकल केअर तज्ज्ञ – डॉ. चेतन शर्मा आणि डॉ. रूपेश बोकाडे, इन्फेक्शन स्पेशलिस्ट डॉ. अश्विनी तायडे, नेफ्रोलॉजिस्ट – डॉ. सूर्यश्री पांडे आणि आयसीयू नर्सिंग टीम या सर्वांनी योगदान दिले आणि एक जीव वाचविला .
डॉ. अक्षय सिंग हे डॉ. एनबी (डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड) इन कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक सर्जरी आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन (एनबीई) द्वारे प्रदान केलेली ही एक सुपर स्पेशालिटी डिग्री आहे.
हे प्रकरण खरोखरच आव्हानात्मक होते, परंतु लाइफ व्हिनस या आपल्या टॅगलाइन वर खरे उतरून प्रत्येकाने आपले पूर्ण योगदान दिले आणि एक मौल्यवान जीव वाचविला.
श्री अभिनंदन दस्तेनवार, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, वोक्हार्ट हॉस्पिटल्सला अशा अत्याधुनिक सुविधांचा अभिमान वाटतो ज्यामुळे अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे शक्य होते. ही खरोखर एक आव्हानात्मक केस होती आणि आमचे तज्ञ डॉक्टर, क्रिटिकल केअर तज्ञ टीम, इन्फेक्शन स्पेशलिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट आणि नर्सिंग स्टाफने अप्रतिम काम केले आणि एक जीव वाचविला.